Pimpri : फुरसुंगी नगरपरिषद मुख्याधिकार्यांची पालिकेत उपायुक्तपदी नियुक्ती
Updated On:

पिंंपरी : फुरसुंगी- उरुळी देवाची नगरपरिषदेचे मुख्याधिकारी सचिन पवार यांची प्रतिनियुक्तीवर पिंपरी चिंचवड महापालिका उपायुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्याकडे आरोग्य विभागाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
तर आरोग्य विभागाचे सहाय्यक आयुक्त अजिंक्य येळे यांच्या पदस्थापनेबाबत स्वतंत्रपणे आदेश निर्गमित केले जाणार आहेत.
राज्य सरकारच्या नगरविकास विभागाकडून पवार यांच्या नियुक्तीबाबतचे आदेश महापालिका प्रशासनाला प्राप्त झाले आहेत.
तर पुणे जिल्हाधिकारी कार्यालयातील नगरपालिका प्रशासन शाखेच्या वतीने यापूर्वीच पवार यांना कार्यमुक्त करण्यात आले आहे.





