Pimpri Accident : जगताप डेअरी पुलाखाली पीएमपीएमएल बसने तरुणाला उडवले; बंगालच्या तरुणाचा पुण्यात दुर्दैवी अंत

प्रभात वृत्तसेवा
पिंपरी – भरधाव वेगातील पीएमपीएमएल बसने धडक दिल्यामुळे झालेल्या अपघातात एका तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना वाकड येथील जगताप डेअरी ब्रिजखाली बुधवारी (दि. १९) रात्री घडली.अकीर हमिजुद्दीन शेख (वय २५) असे अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या तरुणाचे नाव आहे.
याबाबत त्याचा मामेभाऊ छंन्नात अली शेख (वय २८, धंदा हॉटेल मॅनेजर, रा. मयुर लॉज, ताथवडे, मूळगाव पंडितपुर, जि. नदिया, पश्चिम बंगाल) यांनी गुरुवारी (दि. २०) याबाबत वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. किशोर महादेव मोरे (वय ४२, रा. माण डेपो फेज-२, हिंजवडी पावर हाऊस, पुणे) असे गुन्हा दाखल केलेल्या आरोपीचे नाव असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे.
बुधवारी पावणे बारा वाजताच्या सुमारास फिर्यादी छंन्नात शेख यांच्या मामाचा मुलगा अकीर हमिजुद्दीन शेख हा रस्ता ओलांडत होता. त्यावेळी भरधाव वेगात आलेल्या पीएमपीएमएलच्या बस हिने त्यांना जोरदार धडक दिली. डोक्यात व शरीरावर गंभीर दुखापत होऊन त्यांचा मृत्यू झाला.





