Pimpri : ‘सफल’ उद्योजिका बनण्यासाठी महिलांना ‘आधार’

लोणावळा : आधार फाउंडेशन व सफल फाउंडेशन यांच्या माध्यमातून लोणावळा शहरातील २५ महिलांना गृह उपयोगी वस्तू बनविण्याच्या मशिनचे वाटप करण्यात आले आहे. तसेच फाउंडेशनकडून भांगरवाडी येथील कार्यालयात सदर महिलांना प्रशिक्षण देखील देण्यात येणार आहे. बुधवारी (दि.२९) या मशिनचे वाटप करण्यात आले.
याप्रसंगी ग्रोथ विद्यापीठाचे संस्थापक लतेश शहा, सफल फाउंडेशनच्या नीता गंगवार, अनुज गंगवार, आधार फाउंडेशनचे प्रकाश पाठारे, मारुती साठे, ॲड. चेतन पंड्या, सुनील गुप्ता, सनी दळवी, पंकज काडे, मधु माधवन, भाऊ जाधव, अन्वर शेख, रेश्मा शेख, कांचन लुनावत, अपर्णा शेडगे, नामदेवराव डफळ, मनीषा भांगरे, भगवान घनवट, दत्तात्रय लाड उपस्थित होते.
‘आधार’चे संस्थापक प्रकाश पाठारे म्हणाले, तळागाळातील गरजू महिलांना स्वावलंबी बनविण्यासाठी त्यांच्या हातांना हक्काचे काम देण्यासाठी आम्ही हा उपक्रम सुरू केला आहे. महिलांना दिलेल्या मशिनमध्ये कार वॉश लिक्वीड बनविण्याचे मशीन, डिश वॉश लिक्वीड, टॉयलेट क्लिनर लिक्वीड, फ्लोअर क्लिनर लिक्वीड, बाथरूम क्लिनर लिक्वीड, गोधडी व रजई बनविणे मशीन, बॉबी व्हील, पॉप कॉन मशीन, स्क्रबर घासणी, टूथ ब्रश बनविणे, झाडू बनविणे, वायफर बनविणे आदी यंत्रांचा समावेश आहे.





