Pimpri : कार्ला येथून ५५ वर्षीय व्यक्ती बेपत्ता
Updated On:

कार्ला : येथील शेतकरी अशोक (तात्या) खंडू हुलावळे (वय ५५ वर्षे, रा. कार्ला ता. मावळ) हे घरात कुणालाही न सांगता घर सोडून गेले आहे.
याबाबत लोणावळा पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे. ते तीन महिन्यांपासून कार्ला येथून बेपत्ता असून ते हरविल्याची तक्रार सुभद्रा अशोक हुलावळे यांनी पोलीस ठाण्यात दिली.
अशोक हुलावळे हे पाच फूट उंच असून अंगात काळी पॅन्ट व पांढरा शर्ट असा वेष त्यांनी परिधान केला असून कपाळावर कुंकू असल्याचे तक्रारीत नमूद आहे.
ही व्यक्ती कुठेही आढळून आल्यास ८४१२०५७६७५ किंवा ९३५९५४३६८४ क्रमांकावर तसेच लोणावळा ग्रामीण पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.





