पिंपरी : पिंपरी-चिंचवड प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वायुवेग पथकाने थकीत कर वसुलीसाठी मोटार वाहन कायद्यातील गुन्ह्यातंर्गत कार्यालयाच्या आवारात वाहन मालक किंवा चालक यांच्या जबाबदारीवर अटकावून ठेवलेली वाहने वाहन मालकांनी तडजोड शुल्क, मोटार वाहन कर, पर्यावरण कर भरुन 9 जून 2025 पर्यंत सोडवून घ्यावीत, असे आवाहन करण्यात आले आहे. प्रादेशिक परिवहन कार्यालयाने मोटार वाहन थकीत कराच्या वसुलीसाठी अटकावून ठेवलेल्यांपैकी 49 वाहनांच्या प्रकरणांमध्ये वाहन मालक, चालक किंवा वित्तदात्यांनी कार्यालयाशी संपर्क साधून 9 जून 2025 पर्यंत वाहने सोडवून घ्यावीत. या वाहनांच्या जाहीर लिलावाची प्रक्रिया गुरुवार, 12 जून 2025 रोजी दुपारी 12 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत होणार आहे. वाहने पाहणीकरीता प्रादेशिक परिवहन कार्यालय, पिंपरी-चिंचवड, एसटी आगार तळेगाव आणि वल्लभनगर व राजगुरुनगर (खेड) एसटी आगारात 10 जून 2025 या कालावधीत उपलब्ध आहेत. या वाहनांची यादी प्रादेशिक परिवहन कार्यालय, पिंपरी-चिंचवड, संत नगर, मोशी प्राधिकरण, पिंपरी-चिंचवड कार्यालय आणि तळेगाव व राजगुरुनगर (खेड) एसटी आगार कार्यालयाच्या सूचना फलकावर प्रदर्शित केलेली आहे. अधिक माहितीकरीता https://eauction.gov.in आणि www.mstcindia.co.in या संकेतस्थळावर भेट द्यावी. तसेच प्रादेशिक परिवहन कार्यालय, पिंपरी-चिंचवड, संत नगर, मोशी प्राधिकरण, पिंपरी-चिंचवड 020-27232828 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन उप प्रादेशिक अधिकारी राहुल जाधव यांनी केले आहे.