Pimpri : पिंपरी न्यायालयात न्यायाधीशांचा बार असोसिएशनतर्फे निरोप समारंभ

पिंपरी : पिंपरी न्यायालयात कार्यरत असणारे न्यायाधीश मे. एम. जी. मोरे आणि मे. बी. डी. चोखट यांची अनुक्रमे लातूर आणि औरंगाबाद येथे नियमित बदली झाली आहे. त्यानिमित्त पिंपरी न्यायालयातील पुरुष बार रूम येथे त्यांचा निरोप समारंभ उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमाचे आयोजन पिंपरी चिंचवड ॲडव्होकेट्स बार असोसिएशनच्या वतीने करण्यात आले.
यावेळी पिंपरी न्यायालयाचे प्रमुख न्यायाधीश मे. एन. आर. गजभिये, मे. एस. एन. गवळी, मे. अल अमुदी, मे. एम. जी.मोरे, मे. एस. एस. चव्हाण, मे. बी. डी. चोखट, मे. व्हि. डी. गायकवाड, मे. पी. डी. पाटील यासोबतच पिंपरी चिंचवड ॲडव्होकेट्स बार असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष ॲड. गौरव वाळुंज, माजी अध्यक्ष ॲड. सुशील मंचरकर, ॲड. सुदाम साने, ज्येष्ठ वकील ॲड. संगीता परब, ॲड. सुजाता बिडकर, ॲड. मेरी रणभिसे, ॲड. राज जाधव, माजी सचिव ॲड. महेश टेमगिरे, ॲड. अनिल शिंदे, ॲड. फारूक शेख, ॲड. पल्लवी विघ्ने यांचेसह मोठ्या प्रमाणात वकील बांधव व न्यायालयीन कर्मचारी उपस्थित होते.
या निरोप समारंभ प्रसंगी बार असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष ॲड. गौरव वाळुंज, माजी अध्यक्ष ॲड. सुशील मंचरकर, ॲड. सुदाम साने, ज्येष्ठ वकील ॲड. संगीता परब, ॲड. सुजाता बिडकर, ॲड. राज जाधव, ॲड. महेश टेमगिरे, ॲड. अनिल शिंदे यांनी मनोगतपर शुभेच्छा दिल्या, तर न्यायाधीश मे.एम. जी. मोरे व मे. बी. डी. चोखट यांनी पिंपरी न्यायालयात काम करण्याची संधी मिळाली व वकील मंडळीने दिलेल्या प्रेमाबद्दल आभार व्यक्त केले.
कार्यक्रमाचे आयोजन अध्यक्ष ॲड. गौरव वाळुंज, सचिव ॲड. उमेश खंदारे, महिला सचिव ॲड. रीना मगदूम, सदस्य ॲड. संकेत सरोदे, ॲड. राजेश राजपुरोहित यांनी केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार सचिव ॲड. उमेश खंदारे यांनी मानले.





