Pimpari News : देहू-आळंदी रोडवर भरधाव क्रेनच्या धडकेत वारकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू
Updated On:

पिंपरी : देहू-आळंदी रोडवर तळवडे येथे बुधवारी दुपारी ११:४५ च्या सुमारास भरधाव क्रेनच्या धडकेने एका वारकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. मृत वारकरी नारायण गोदवे (वय ५७, रा. आहेरगाव, ता. माढा, जि. सोलापूर) हे देहूवरून आळंदीकडे पायी निघाले होते.
तळवड्यातील शेलार वस्तीजवळ पोहोचले असताना मागून येणाऱ्या क्रेनने त्यांना जोरदार धडक दिली. यात ते गंभीर जखमी झाले. चिखली पोलिसांनी त्यांना तातडीने वायसीएम रुग्णालयात दाखल केले, परंतु डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
पोलिसांनी गोदवे यांच्या मोबाइलवरून त्यांच्या मुलाशी मुंबई येथे संपर्क साधला. आरोपी क्रेन चालकाला ताब्यात घेण्यात आले असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.





