Manoj Naravane : पिक्चर अभी बाकी है….; माजी लष्कर प्रमुख मनोज नरवणे यांच्या पोस्टने वाढवला सस्पेन्स

नवी दिल्ली : पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याला भारतीय सैन्याने जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. भारतीय सैन्याने पाकिस्तानमधील 9 दहशतवादी ठिकाणांवर मिसाइलने हल्ला करून उद्ध्वस्त केले आहेत. ऑपरेशन सिंदूरअंतर्गत भारतीय सैन्याने ही कारवाई केली आहे. भारताने पाकिस्तानमधील चार आणि पाकव्याप्त काश्मीरमधील पाच दहशतवादी तळांना लक्ष्य केले. या हल्ल्यात दहशतवाद्यांचे मुख्यालय आणि कॅम्प उद्ध्वस्त झाले आहेत. या हल्ल्यानंतर भारताचे माजी लष्कर प्रमुख मनोज नरवणे यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट टाकली, ज्यामुळे आता सस्पेन्स आणखी वाढला आहे.
ऑपरेशन सिंदूर यशस्वीपणे पार पाडल्यानंतर भारतीय सैन्याने सोशल मीडियावर ‘न्याय मिळाला, जय हिंद!’ असे पोस्ट केले होते. या कारवाईमुळे पाकिस्तानमध्ये खळबळ उडाली आहे. आज भारतीय सैन्याने घेतलेल्या पत्रकार परिषदेत या कारवाईची माहिती देण्यात आली. दहशतवादी हल्ल्यातील पीडितांना न्याय मिळवून देण्यासाठी ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवण्यात आले, असे कर्नल सौफिया कुरैशी यांनी सांगितले.
Abhi picture baki hai…
— Manoj Naravane (@ManojNaravane) May 7, 2025
यानंतर माजी लष्कर प्रमुख मनोज नरवणे यांनी ‘एक्स’वर एक पोस्ट टाकली आहे. “पिक्चर अभी बाकी है।” असे त्यांनी या पोस्टवर लिहिले आहे. त्यांनी यापुढे काहीही लिहिलेले नाही. भारताने केलेल्या एअर स्ट्राईकनंतर त्यांनी ही पोस्ट केली आहे. त्यामुळे आता पुढे आणखी काय होणार याचा सस्पेन्स वाढला आहे.





