Priya Marathe’s last post : पतीसोबतचे फोटो अन्….; प्रिया मराठेची शेवटची पोस्ट काय होती?

Priya Marathe’s last post : पवित्र रिश्ता फेम अभिनेत्री आणि हिंदी तसेच मराठी मालिका आणि सिनेमांमध्ये आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात आपलं अढळ स्थान निर्माण करणारी अभिनेत्री प्रिया मराठे हिचं निधन झालं आहे. वयाच्या अवघ्या ३८ व्या वर्षी तिने अखेरचा श्वास घेतला आहे. गेल्या काही काळापासून ती कॅन्सर या आजाराने ग्रस्त होती. तिच्या अकाली एक्झिटने मनोरंजन विश्वावर शोककळा पसरली आहे. मराठी कलाकारांनीही तिच्या निधानाची बातमी धक्का देणारी आहे.
एका मालिकेतून अचानक ब्रेक घेतल्यानंतर प्रियाने सोशल मीडियावरून देखील तिचा वावर कमी झाला होता. तिने इन्स्टाग्रामवर शेवटची पोस्ट 11 ऑगस्ट 2024 रोजी अपलोड केली आहे. या पोस्टमध्ये प्रियाने तिचा पती शंतनू मोघेसोबतचे काही फोटो शेअर केले होते.
प्रियाला फिरायची प्रचंड आवड होती. ती पतीसोबत जयपूरमध्ये अमेर फोर्ट फिरतानाचे हे थ्रोबॅक फोटो होते. किल्ल्याची भव्यता आणि रचनेतील गुंतागुंत पाहून आम्ही थक्क झालो, असं कॅप्शन प्रियाने या फोटोंना दिलं आहे. प्रियाच्या या शेवटच्या पोस्टवर चाहते कमेंट करत दु:ख व्यक्त करत आहेत.
View this post on Instagram
अनेकांना प्रिया या जगात नाही यावरच विश्वास बसत नाहीये. प्रिया मराठे हिने या सुखांनो या मालिकेतून कलाक्षेत्रात पदार्पण केलं होतं. त्यानंतर तिने विविध हिंदी आणि मराठी मालिकांमध्ये अभिनय केला. पवित्र रिश्ता या मालिकेने तिला मोठी प्रसिद्ध मिळवून दिली.
चार दिवस सासूचे, स्वराज्यरक्षक संभाजी या मालिकेतील तिच्या अभिनयाने प्रेक्षकांना तिने दखल घेण्यास भाग पाडलं. आज सकाळी तिच्या निधनाने तिच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. याशिवाय तिच्या चाहत्यांनाही खूप मोठा धक्का बसला आहे. तिच्या निधनाच्या बातमी मनाला चटका लावणारी आहे.
हेही वाचा : Prajakt Mali : चांगली माणसं देव का नेतो? प्रिया मराठेच्या निधनानंतर प्राजक्ता माळी भावूक





