Photos : मौनी रॉयची हळद दणक्यात; ग्लॅमरस लुकमुळे पुन्हा वेधलं फॅन्सचं लक्ष

Updated On:-5 फोटो
Photo 1
1 / 5

आणखी संबंधित फोटो

मुंबई – बॉलीवूडमध्ये सध्या वेडिंग सीझन सुरू आहे. राजकुमार राव-पत्रलेखा, राहुल नागल-श्रद्धा आर्या, कतरिना-विकी कौशल, अंकिता लोखंडे-विकी जैन यादी सेलिब्रिटींनी लग्न करून आपला संसार थाटला आहे. आता याच यादीत नागिन फेम अभिनेत्री ‘मौनी रॉय’चा सुद्धा नंबर लागला आहे.

गोव्यात मौनी रॉय आणि बॉयफ्रेंड सूरज नाम्बियारचं डेस्टिनेशन वेडिंग पार पडणार असून आता या दोघांकडे लग्नापूर्वीच्या विधींना सुरुवात झाली आहे. नुकतेच मौनीच्या हळदी सोहळ्याचे फोटो समोर आले असून अल्पावधीत हे फोटो वाऱ्यासारखे व्हायरल झाले आहेत.

शेअर झालेल्या या फोटोमध्ये मौनी आणि सूरज या दोघांना हळद लागल्याचं दिसून येत आहे. यावेळी मौनीने पांढऱ्या रंगाचा डिझायनर ड्रेस परिधान केला आहे. तर सूरजने पांढऱ्या रंगाची पठाणी घातल्याचं पाहायला मिळत आहे. या ड्रेस मध्ये हे दोघेही अतिशय सुंदर दिसत होते.

या शाही विवाह सोहळ्यासाठी गोव्यात मोजक्या पाहुण्यांनाच आमंत्रित करण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. त्यामुळे केवळ ५० पाहुण्यांच्या उपस्थितीत मौनीचा लग्न सोहळा रंगणार आहे. मात्र, करोनाचे रुग्ण कमी झाल्यानंतर लवकरच ही जोडी मुंबईत एक ग्रँड रिसेप्शन पार्टी देणार आहेत.

दरम्यान, सूत्रांच्या माहितीनुसार, मौनी आणि सूरज आज म्हणजेच, दि. २७ तारखेला कँडोलिम येथे लग्न बंधनात अडकणार आहेत. मौनी रॉयचा बॉयफ्रेंड सूरज नाम्बियार हा दुबईमध्ये राहणारा बिझनेसमन आणि बँक इन्व्हेस्टर आहे. त्यांचा जन्म बंगळुरू येथे जैन कुटुंबात झाला.

आणखी संबंधित बातम्या

Rahul Gandhi : दिल्‍लीत दुसऱ्या दिवशीही हाय ड्रामा.! राहुल, प्रियांका गांधी यांना पुन्‍हा घेतले ताब्‍यात

Rahul Gandhi : दिल्‍लीत दुसऱ्या दिवशीही हाय ड्रामा.! राहुल, प्रियांका गांधी यांना पुन्‍हा घेतले ताब्‍यात

Devendra Fadnavis : "एमपीएससी आंदोलन हायजॅक, ते पूर्णपणे राजकीय बनले आहे" - मुख्यमंत्री फडणवीस

Devendra Fadnavis : "एमपीएससी आंदोलन हायजॅक, ते पूर्णपणे राजकीय बनले आहे" - मुख्यमंत्री फडणवीस

Oil tanker attack : काळ्या समुद्रातल्या तेलाची वाहतूक करणाऱ्या जहाजावर हल्ला; भारताच्या २३ कर्मचाऱ्यांची सुटका

Oil tanker attack : काळ्या समुद्रातल्या तेलाची वाहतूक करणाऱ्या जहाजावर हल्ला; भारताच्या २३ कर्मचाऱ्यांची सुटका

Narendra Modi : आपण करूनच दाखवू..! 'विकसित भारत संकल्प सभे'ला संबोधित करताना नरेंद्र मोदींचा नवा नारा

Narendra Modi : आपण करूनच दाखवू..! 'विकसित भारत संकल्प सभे'ला संबोधित करताना नरेंद्र मोदींचा नवा नारा