#फोटो : माऊली निघाले विठू भेटीला
Updated On:

लाखो भाविकांच्या मांदियाळीत हरिनामाचा गजर करीत माऊलींच्या पालखीने आज (मंगळवारी) प्रस्थान ठेवले. टाळ-मृदंग, वीणेच्या झंकाराचा निनाद, आल्हाददायक वातावरण, हरिनाम उत्साह वाढवीत होता. तर खांद्यावर भगव्या पताका, गळ्यात तुळशीमाळ, कपाळी बुक्का अन् मुखी हरिनामाचा जयघोष करीत राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या लाखो वैष्णवांच्या मेळाव्याने इंद्रायणी तीर, अलंकापुरी आणि माऊली मंदिर प्रांगण दुमदुमून गेले होते.
चित्रे : सूर्यकांत गावडे
- माऊलींच्या पालखी प्रस्थान सोहळ्याआधी टाळ खरेदी करण्यासाठी पाहणी करताना महिला वारकरी.
- प्रस्थान सोहळ्याप्रसंगी माऊलींच्या संजीवन समाधीवर फुलांची केलेली आकर्षक सजावट.
- प्रस्थान सोहळ्याप्रसंगी मंदिर परिसरात टाळ-मृदंगाचा गजर करताना वैष्णव.
- प्रस्थान सोहळ्याप्रसंगी मंदिर परिसरात विविध खेळात दंग असलेले वैष्णवजन.
- माऊलींच्या दर्शनासाठी भाविकांनी एकच गर्दी केल्याने त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांना थोडी कसरत करावी लागली.


























