फोटो : पुणे गणेश दर्शन
Updated On:

- नागनाथ पार सार्वजनिक गणपती मंडळ ट्रस्टच्या रिद्धी-सिद्धी महागणपती मंडळाने यंदा शिवशौर्य गाथा हा शिवचरित्रावर आधारित चित्रांचा देखावा साकारला असून भव्य रांगोळी व रायगडाची प्रतिकृतीही साकारली आहे.
- रिद्धी-सिद्धी महागणपती
- करळेवाडी सार्वजनिक ट्रस्टने यंदा पौराणिक घटनेवर आधारित “कुवलियापीडा हत्तीचा वध’ (कृष्णलीला) हा हलता देखावा सादर केला आहे.
- भरत मित्र मंडळाने यंदा “खवळलेला किंग-कॉंग’ हा हलता देखावा सादर केला असून हा किंग कॉंग लहान मुलांना उचलतो, असे दाखवले जात आहे. याचा अनुभव घेण्यासाठी बच्चे कंपनीची पहिल्या दिवसापासूनच गर्दी आहे.
- मॉडेल कॉलनीमधील श्री गुरुदत्त तरुण मंडळाने यंदा अहमदाबाद येथील अक्षरधाम मंदिराची प्रतिकृती साकारली केली आहे. ती भाविकांना आकर्षित करत आहे.
- सदाशिव पेठेतील छत्रपती राजाराम गणेश मंडळाने यंदा कोल्हापूर येथील श्री महालक्ष्मी मंदिराची प्रतिकृती साकारली आहे. ती पाहण्यासाठी भाविकांनी पहिल्या दिवसापासूनच गर्दी केली असून विद्युत रोषणाईत हे मंदिर आणखी झळाळत आहे.
- नारायण पेठेतील संयुक्त प्रसाद मित्र मंडळाने खेळातील विविध साधने आणि खेळणी वापरुन श्रीगणेशाचे रुप साकारले आहे.













