भारत जोडो यात्रेत विलासराव देशमुख यांचा फोटो ! अभिनेता रितेश देशमुख भावूक

मुंबई – अभिनेता रितेश देशमुख हा राजकारणात नसला तरी त्याने राजकारण लहानपनापासून पाहिले आहे. त्याचे वडील विलासराव देशमुख महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिलेले असल्यामुळे रितेश थेट राजकारणात नसला तरी त्याला मोठा राजकीय वारसा लाभलेला आहे. आजही रितेश अनेकदा आपले वडील विलासराव देशमुख यांना मिस करताना दिसतो. नुकतंच रितेशने आपल्या वडिलांचा एक फोटो शेअर केला आहे जो काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेतील आहे.
राहुल गांधींच्या नेतृत्वात सध्या भारत जोडो यात्रा सुरु आहे. नांदेडमधून या यात्रेचा महाराष्ट्रातील प्रवास सुरु झाला. या यात्रेमध्ये एका काँग्रेस कार्यकर्त्याने स्वर्गीय विलासराव देशमुख याची प्रतिमा हातात घेतलेला एका फोटो रितेशने ट्विट केला आहे. यावेळी रितेशने आपल्या वडिलांना मिस करत ट्विटमध्ये हार्ट इमोजी देखील पोस्ट केल्या आहेत.
💚💚💚 pic.twitter.com/grft3HLwUF
— Riteish Deshmukh (@Riteishd) November 12, 2022
याआधी देखील रितेशने आपल्या वडिलांबाबतच्या अनेक आठवणींना उजाळा देणारे व्हिडीओ पोस्ट केले होते. ज्यातील वडिलांच्या कोट सोबत काढलेला व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला होता.रितेशने हा फोटो शेअर करताच अनेकांनी त्यावर तुम्हीही भारत जोडो यात्रेमध्ये सहभागी होणार का ? असा सवाल उपस्थित केला आहे.




