PHOTO : आदिती आणि सिद्धार्थचा रोमॅंटिक अंदाज

Aditi-Siddharth Photos| बॉलिवूड अभिनेत्री आदिती राव हैदरी सध्या तिच्या ‘हिरामंडी’ या वेबसीरिजमुळे चर्चेत आहे. यातील तिच्या अभिनयाचे सर्वत्र कौतुक होत आहे. सोशल मीडियावर देखील तिच्या गाण्याने धुमाकूळ घातला आहे. याशिवाय आदिती तिच्या पर्सनल लाईफमुळे देखील चर्चेत असते.
आदिती आणि अभिनेता सिद्धार्थने मार्च महिन्यात गुपचूप साखरपुडा उरकला. सध्या हे दोघे अनेक इव्हेंटला एकत्र उपस्थित राहत असल्याचे देखील पाहायला मिळते. हे कपल सध्या एकत्र सुट्टीवर गेले आहेत. नुकतेच आदितीने इन्स्टाग्रामवर रोमँटिक फोटो शेअर केले आहेत. मात्र हे दोघे नेमक्या कोणत्या ठिकाणी गेलेत हे त्यांनी सांगितलेले नाही.
शेअर केलेल्या फोटोंमध्ये दोघांचाही सिंपल अंदाज पाहायला मिळत आहे. आदितीने दोघांचेही फोटो शेअर करताना, ‘ग्रेटफुल’ असं कॅप्शन दिलं आहे. दोघांचे हे फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.
View this post on Instagram
गेल्या अनेक दिवसांपासून दोघेही एकमेकांना डेट करत असून त्यांनी कधीच दोघांचं नातं जगापासून लपवून ठेवलं नाही. अनेकदा ते एकत्र स्पॉटही झाले आहेत. 2021 मध्ये ‘महा समुद्रम’ चित्रपटाच्या सेटवर दोघांची भेट झाली होती. जिथे आदिती आणि सिद्धार्थची मैत्री झाली आणि नंतर प्रेमाची कबुली दिली.
त्यानंतर आदिती आणि सिद्धार्थने गेल्या काही दिवसांपूर्वी तेलंगणाच्या ४०० वर्षे जुन्या मंदिरात साखरपुडा केला. त्यानंतर या कपलने एक फोटो शेअर करत चाहत्यांना साखरपुडा केल्याची गुडन्यूज दिली होती. आता चाहते सध्या त्यांच्या लग्नासाठी उत्सुक आहेत. Aditi-Siddharth Photos|
हेही वाचा:
लग्नावरून परतणाऱ्या वऱ्हाडावर काळाचा घाला ; चार मुलांसह १५ जणांचा जागीच मृत्यू, १५ गंभीर जखमी





