Aircraft Crash : दोन विमानांची हवेत धडक होऊन भीषण अपघात; दुर्घटनेत चार वैमानिकांचा मृत्यू
Aircraft Crash : फिलिपाइन्समध्ये प्रशिक्षणादरम्यान दोन SF-260 विमानांची हवेत धडक होऊन चार वैमानिकांचा मृत्यू झाला. सर्व SF-260 विमानांची उड्डाणे तात्पुरती थांबवली.

Aircraft Crash : फिलिपाइन्समध्ये प्रशिक्षणादरम्यान दोन लष्करी विमानांची हवेत धडक होऊन भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत चार वैमानिकांचा मृत्यू झाला. हा अपघात 23 ऑक्टोबर रोजी दुपारी 3:51 वाजता मनिलाच्या दक्षिणेला असलेल्या बटांगास प्रांतातील फर्नांडो एअर बेसवर झाला.
फिलिपाइन्सच्या हवाई दलाने दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही विमाने SF-260 प्रकारची प्रशिक्षण विमाने होती. दोन्ही विमाने एअर बेसच्या हद्दीतच कोसळली. जमिनीवरील अन्य कोणालाही दुखापत झाल्याची माहिती नाही. स्थानिक वृत्तांनुसार, दोन्ही विमानांची हवेतच धडक झाली.
Philippine Air Force planes FLY DANGEROUSLY CLOSE before COLLIDING MID-AIR — BOTH SPIRAL OUT OF CONTROL & CRASH during TRAINING
4 AIR FORCE PILOTS KILLED https://t.co/fgqEdxJNM3
— RT (@RT_com) October 24, 2026
अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. त्यासाठी चौकशी सुरू करण्यात आली आहे. खबरदारी म्हणून फिलिपाइन्सच्या हवाई दलाने आपल्या ताफ्यातील सर्व SF-260 विमानांची उड्डाणे तात्पुरती थांबवली आहेत. मृत वैमानिकांची नावे कुटुंबीयांच्या विनंतीनुसार जाहीर करण्यात आलेली नाहीत.
यापूर्वी मे 2026 मध्ये बेंगुएट प्रांतात SF-260 विमान प्रशिक्षणादरम्यान कोसळून दोन वैमानिकांचा मृत्यू झाला होता. 2023 मध्येही याच प्रकारच्या विमानाच्या अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला होता.





