चीनच्या ‘बेल्ट ऍन्ड रोड इनिशिएटिव्ह’मधून फिलिपाईन्स बाहेर..

नवी दिल्ली – चीनच्या (Chaina) पुढाकाराने राबवण्यात येत असलेल्या “बेल्ट ऍन्ड रोड इनिशिएटिव्ह’मधून फिलिपाईन्सने (Philippines ) माघार घेतली आहे. महामार्ग आणि रेल्वेच्या पायाभूत सुविधा उभारण्यासाठी फिलिपाईन्सकडून आता जपान आणि पाश्चात्य कंपन्यांना प्राधान्य दिले जाणार आहे. फिलिपाईन्सच्या परिवहन विभागाच्यावतीने ही माहिती देण्यात आली.
“बेल्ट ऍन्ड रोड इनिशिएटिव्ह’ (‘Belt and Road Initiative) अंतर्गत सक्रिय असलेल्या कंपन्यांनी आर्थिक आणि राजकीय मुद्यांच्या आधारे केलेल्या गुंतवणूकीवर फिलिपाईन्सच्या मंत्रिमंडळाने शंका उपस्थित केल्या आहेत. फिलिपाईन्स गेल्या 6 वर्षांपासून “बीआरआय’मध्ये सहभागी होता. चीनच्या कर्जाच्या सापळ्याविषयी फिलिपाईन्समध्ये मोठ्या प्रमाणावर नाराजी व्यक्त व्हायला लागली होती.
दक्षिण चीन समुद्रामध्ये फिलिपाईन्सला फारच कमी सवलती दिल्या जात असताना पायाभूत सुविधांसाठी मोठी गुंतवणूक करायला फिलिपाईन्सला भाग पाडले जाऊ लागल्याचे बोलले जाऊ लागले होते. चीनने या पायाभूत प्रकल्पांच्या उबारणीसाठी 24 अब्ज डॉलरची गुंतवणूक करण्याची ग्वाही दिली होती. मात्र प्रत्यत्रात चीनकडून ही गुंतवणूक प्रत्यक्षात झालीच नाही.
त्यामुळेही फिलिपाईन्सचे अध्यक्ष दुतेर्ते नाराज होते. आता “बीआरआय’मधून फिलिपाईन्स बाहेर पडल्यामुळे चीन आणि फिलिपाईन्सदरम्यानचे संबंध बिघडण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.





