लस संशोधनाचे ‘हे’ आहेत महत्वाचे टप्पे!

Updated On:

कोणतीही लस तयार करण्यापूर्वी त्या जिवाणू किंवा विषाणूचा पूर्ण शास्त्रीय अभ्यास केला जातो. त्या रोगजंतूच्या सर्व क्रिया-प्रक्रियांची पडताळणी केली जाते. त्यानंतर लस तयार करून प्रथम प्रयोगशाळेत जिवाणूंवर प्रयोग केले जातात. त्याला ‘इनव्हिट्रो स्टडीज’ म्हणतात. त्यानंतर उंदीर-ससा अशा प्राण्यांवर तसेच माकडांवर प्रयोग केले जातात. याला ‘इनव्हिट्रो स्टडीज’ म्हणतात. यामध्ये लशीचा सकारात्मक परिणाम दिसून आल्यास माणसांवरील प्रयोगांच्या पहिल्या टप्प्याला परवानगी मिळते. त्यात एकूण तीन टप्पे किंवा फेजेस असतात.

फेज १ : यामध्ये पाच ते दहा व्यक्तींवर या लशीचा प्रयोग केला जातो. यात लशीचा रोगजंतू नष्ट करण्याचे कार्य आणि सुरक्षितता समजून येते आणि परिणामकारक डोस ठरवला जातो.
फेज २ : यामध्ये सुमारे १०० ते २०० व्यक्तींवर आणि क्वचित प्रसंगी एक हजार व्यक्तींवर लशीचे परिणाम पडताळले जातात. लस या सर्वांमध्ये सातत्याने तेवढाच अपेक्षित परिणाम देते आहे ना? हे पाहिले जाते आणि लशीच्या साइड इफ्फेक्ट्सची नोंद केली जाते. जास्त गंभीर दुष्परिणाम असल्यास प्रयोग थांबवले जाऊ शकतात.
फेज ३ : यामध्ये हजारो लोकांवर व्यापक स्वरूपात प्रयोग केले जातात. यामध्ये निरनिराळ्या वंशाच्या, वर्णाच्या, वयाच्या निरोगी स्त्रीपुरुषांचा समावेश केलेला असतो. यात लशीच्या उपयुक्ततेचे आणि दुष्परिणामांचे अनुभव सर्वेक्षणात नोंदवले जातात. यामध्ये क्वचित प्रसंगी उद्‌भवणारे दुर्मीळ साइड इफेक्टसुद्धा पाहिले जातात.
फेज ४ : तिसऱ्या टप्प्यानंतर लस बाजारात आणली जाते किंवा निरनिराळ्या देशात ती देण्याचे कार्य सुरू होते. यामध्येही सर्वेक्षण सुरू ठेवतात. लशीचे आधी लक्षात न आलेले दुष्परिणाम, जंतूंचे बदललेले स्वरूप याकडे लक्ष पुरवले जाते. अनेकदा या टप्प्यातदेखील लशीच्या स्वरूपात महत्त्वाचे बदल करून ती उपलब्ध केली जाते.

टॅग्स:

आणखी संबंधित बातम्या

Jayant Patil : आता आपोआपच लॉकडाऊन होईल; जयंत पाटलांची सरकारवर टीका

2026-05-17 19:03:58

Jayant Patil : आता आपोआपच लॉकडाऊन होईल; जयंत पाटलांची सरकारवर टीका

Sanjay Raut : उद्धव ठाकरेंमुळे एकनाथ शिंदेंचा जीव वाचला; संजय राऊतांनी लगावला टोला

2026-05-02 18:27:43

Sanjay Raut : उद्धव ठाकरेंमुळे एकनाथ शिंदेंचा जीव वाचला; संजय राऊतांनी लगावला टोला

Covid 19: कोरोनाचा नवा व्हेरियंट 23 देशांत पसरला; जगभरात आरोग्याबाबत चिंता वाढली

2026-03-26 18:53:45

Covid 19: कोरोनाचा नवा व्हेरियंट 23 देशांत पसरला; जगभरात आरोग्याबाबत चिंता वाढली

Rahul Gandhi : "मोदींना करोना काळातील दु:खद घटनांचा विसर पडला..."; राहुल गांधींची खोचक टीका

2026-03-24 19:57:24

Rahul Gandhi : "मोदींना करोना काळातील दु:खद घटनांचा विसर पडला..."; राहुल गांधींची खोचक टीका

Narendra Modi : कोरोनाप्रमाणेच पश्चिम आशिया संकटावरही मात करू; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केला विश्वास

2026-03-23 18:51:14

Narendra Modi : कोरोनाप्रमाणेच पश्चिम आशिया संकटावरही मात करू; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केला विश्वास