सलग 6 दरवाढींमुळे पेट्रोल, डिझेल 3 रूपयांपेक्षा अधिक महाग
Updated On:

नवी दिल्ली-पेट्रोल आणि डिझेल शुक्रवारी सलग सहाव्या दिवशी महागले. त्या इंधनांच्या दरांत लिटरमागे अनुक्रमे 57 पैशांची आणि 59 पैशांची वाढ करण्यात आली. सलग 6 दरवाढींमुळे पेट्रोल 3 रूपये 31 पैशांनी तर डिझेल 3 रूपये 42 पैशांनी महागले आहे. आता दिल्लीत लिटरमागे पेट्रोलचा दर 74 रूपये 57 पैसे, तर डिझेलचा दर 72 रूपये 81 पैसे इतका झाला आहे.
सार्वजनिक इंधन कंपन्यांकडून करण्यात आलेल्या दरवाढीमुळे संपूर्ण देशात पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढत आहेत. मात्र, स्थानिक विक्री कर किंवा मूल्यवर्धित कराच्या (व्हॅट) वेगवेगळ्या दरांमुळे प्रत्येक राज्यात पेट्रोल आणि डिझेलच्या किमती भिन्न असतील. सार्वजनिक कंपन्यांनी 82 दिवसांच्या खंडानंतर पेट्रोल आणि डिझेलच्या किमती दररोज निश्चित करण्याची प्रक्रिया सुरू केली. तेव्हापासून त्या इंधन दरांत सलग वाढ झाली आहे.




