निवडणूक जाहीर करा, पेट्रोल-डिझेलचे दर आपसूकच कमी होतील; सेनेच्या खासदाराने लगावला टोला
Updated On:

मुंबई – पाच राज्यांच्या निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यानंतर पेट्रोल आणि डिझेलचे दर पुन्हा वाढू लागले आहेत. गेल्या पाच दिवसांत पेट्रोल-डिझेलची किंमत चार वेळा वाढली आहे. 22 मार्चपासून आतापर्यंत 2.40 रुपयांनी ह्या किंमती वाढल्या आहेत. त्यावरून निवडणूक जाहीर करा, पेट्रोल-डिझेलचे दर आपसूकच कमी होतील असा टोला शिवसेना खासदार प्रियांका चतुर्वेदी यांनी केंद्र सरकारला लगावला आहे.
प्रियंका चतुर्वेदी यांनी ट्विटरवर लिहिले की, निवडणूक आयोगाला विनंती आहे की, आगामी राज्यांमधील निवडणुकांचे वेळापत्रक त्वरित जाहीर करावे, जेणेकरून वाढलेली किंमत कमी व्हावी आणि लोकांना दिलासा मिळेल. त्यांनी पुढे लिहिले निवडणूक = इंधन दरात वाढ नाही. असा खोचक टोला शिवसेना खासदार चतुर्वैदी यांनी लगावला आहे.





