<form id="form1" action="SmartFlow.aspx" method="post">नवी दिल्ली – सार्वजनिक इंधन कंपन्यांनी शुक्रवारी पेट्रोल आणि डिझेलच्या दरांत लिटरमागे अनुक्रमे 31 आणि 35 पैशांची वाढ केली. त्यामुळे सलग चौथ्या दिवशी दोन्ही इंधनांच्या दरवाढीचे सत्र कायम राहिले. त्या चौकारामुळे चालू आठवड्यात पेट्रोल 1 रूपया 21 पैशांनी, तर डिझेल 1 रूपया 25 पैशांनी महागले.<br /> नव्या दरवाढीमुळे पेट्रोल दिल्लीत 88 रूपये 14 पैशांवर, तर मुंबईत 94 रूपये 64 पैशांवर पोहचले.आता डिझेलचा दर दिल्लीत 78 रूपये 38 पैसे, तर मुंबईत 85 रूपये 32 पैसे इतका झाला आहे. मागील वर्षीच्या मार्चपासून पेट्रोल 18 रूपये 57 पैशांनी, तर डिझेल 16 रूपये 09 पैशांनी महागले आहे. दोन्ही इंधनांचे दर उच्चांकी पातळीवर पोहचूनही त्यावरील कर कमी करण्यास केंद्र सरकार तयार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे इंधन दरांच्या भडक्याने सर्वसामान्यांची होणारी होरपळ तूर्त थांबणार नसल्याचेच संकेत आहेत. त्यापार्श्वभूमीवर, इंधन दरवाढीविरोधात देशव्यापी निदर्शने करण्याच्या हालचाली कॉंग्रेसने सुरू केल्या आहेत.</p> </form>