Pete Hegseth : अमेरिकेचे संरक्षण मंत्री पीट हेगसेथ यांच्याकडून दक्षिण कोरियाचे कौतुक

सेऊल, (दक्षिण कोरिया) : दक्षिण कोरियाने आपल्या संरक्षण खर्चामध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतल्याबद्दल अमेरिकेचे संरक्षण मंत्री पीट हेगसेथ यांनी आनंद व्यक्त केला आहे. उत्तर कोरियाकडून स्वतःचे संरक्षण करण्यामध्ये दक्षिण कोरिया महत्वाची भूमिका बजावू शकेल, अशी आशाही त्यांनी व्यक्त केली उत्तर कोरियाच्या संभाव्य धोक्यांना सामोरे जाण्यासाठी दक्षिण कोरियाने स्वतःची क्षमता वाढवणे अत्यंत आवश्यक होते. तसे केल्यामुळे अमेरिकेला चीनवर आपले लक्ष केंद्रित करणे सोपे जाईल, असे हेगसेथ म्हणाले. दक्षिण कोरियाबरोबरच्या वार्षिक संरक्षण विषयक चर्चेसाठी हेगसेथ दक्षिण कोरियाच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी हेगसेथ आणि दक्षिण कोरियाचे संरक्षण मंत्री आन ग्यू यांच्याबरोबर त्यांची चर्चा झाली.
दक्षिण कोरिया आपले संरक्षण उत्पादन वाढवत आहे, ही चांगली गोष्ट आहे. यामुळे दक्षिण कोरियाच्या क्षमतेसाठी वाढीव गुंतवणूक देखील होऊ शकेल. या गुंतवणुकीमुळे दोन्ही देशांमध्ये यामुळे उत्तर कोरियाविरोधातील पारंपारिक प्रतिबंधात्मक उपाययोजना अधिक सक्षम केल्या जाऊ शकतील, असेही हेगसेथ म्हणाले. दक्षिण कोरियाने संरक्षण खर्चामध्ये ८.२ टक्क्यांनी वाढ प्रस्तावित केली असून लकप्रतिनिधींनी या तरतूदीला मान्यता द्यावी, असे दक्षिण कोरियाचे अध्यक्ष ली जेएई म्युंग यांनी संसदेत केलेल्या भाषणात केले होते.
हेगसेथ यांनी केली संरक्षण सज्जतेची पहाणी
पीट हेगसेथ यांनी दक्षिण कोरियाच्या संरक्षण सज्जतेची पहाणी देखील केली. अमेरिकेच्या युद्धनौकेची दुरुस्ती आणि देखभालीच्या कामाची त्यांनी प्रत्यक्ष भेट देऊन माहिती घेतली. उत्तर कोरिया आणि दक्षिण कोरिया दरम्यानच्या सीमा भागातील लष्कर शून्य क्षेत्रात प्रत्यक्ष जाऊन हेगसेथ यांनी दक्षिण कोरियाच्या संरक्षण सिद्धतेची पहाणी देखील केली. या अतिसंवेदनशील भागामध्ये पायी जाऊन त्यांनी लष्करी अधिकाऱ्यांशी संवाद साधला. या क्षेत्रात प्रत्यक्ष भेट देणारे ते अमेरिकेचे पहिले संरक्षण मंत्री आहेत.





