Actress Deepika Padukone : परफेक्ट मॅचिंग! दीपिकाच्या अनोख्या अंदाजाला सासूचीही साद; एअरपोर्टवरचा व्हिडीओ पाहा…

Actress Deepika Padukone : नुकताच अभिनेत्री दीपिका पादुकोण आणि तिची सासू अंजू भाववानी यांचा मुंबई विमानतळावरचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. विमानतळावरून बाहेर पडताना दीपिका तिची सासू आणि नणंद यांच्यासोबत दिसत आहे. यावेळी अभिनेत्रीची सासू-नणंदसोबत असलेले बंधन दिसून येत आले. या व्हिडीओवर चाहत्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.
व्हायरल व्हिडिओमध्ये, दीपिका तिच्या कारमधून विमानतळावर पोहोचली. तिने निळ्या रंगाचा ओव्हरसाईज शर्ट आणि जीन्समध्ये ती दिसली. थोड्या वेळाने, दीपिकाच्या सासू आणि नणंद या दोघेही विमानतळावर दाखल झाल्या. दीपिकाची सासूही निळ्या रंगाचा शर्ट आणि जीन्समध्ये दिसत आहे. सासू आणि सुनेचा जुळणारा ड्रेसिंग प्लॅन ठरवून केला असल्याचा अंदाज लावला जात आहे.
View this post on Instagram
दीपिकाच्या अनेक मुलाखतींमध्ये तिची सासू अंजू भाववानी नेहमीच तिच्याबद्दल सकारात्मक प्रतिक्रिया देत आली आहे. काही वर्षांपूर्वी एका मुलाखतीत, दीपिकाची सासू म्हणाली होती की, ‘ती खूप गोड आहे आणि एक साधी व्यक्ती आहे.’ यामुळे सासू सुनेत असलेली बाँडींग अधोरेखित झाली आहे. दीपिका पदुकोणच्या बोलायचे झाले तर, ती अॅटली दिग्दर्शित ‘AA22xA6’ हा चित्रपट करत आहे. त्यात अल्लू अर्जुन मुख्य नायकाची भूमिका साकारत आहे. अलिकडेच दीपिका पदुकोणचा दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगासोबतचा वादही चर्चेत होता.





