IPL 2025 : ऑपरेशन सिंदूरचा IPL वेळापत्रकावर परिणाम, फ्रँचायझी चिंतेत, काय आहे कारण?

Operation Sindoor Disrupts IPL 2025 Travel Plans : ऑपरेशन सिंदूर नंतर, त्याचा परिणाम भारतावरही झाला आहे. भारतीय सशस्त्र दलांनी पाकिस्तानमधील ९ दहशतवादी अड्ड्यांवर हल्ला केला. ऑपरेशन सिंदूर नंतर भारतातील अनेक विमानतळ बंद आहेत. यामध्ये धर्मशाला विमानतळाचाही समावेश आहे. धर्मशाळा विमानतळ तात्पुरते बंद झाल्यामुळे तेथे खेळण्यासाठी नियोजित आयपीएल संघांच्या प्रवासावर आणि वेळापत्रकावर परिणाम होण्याची शक्यता आहे.
गुरुवारी धर्मशाळा येथे पंजाब किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात सामना होणार आहे. यानंतर, ११ मे रोजी पंजाब आणि मुंबई इंडियन्स यांच्यातील सामना तिथे खेळला जाणार आहे. वृत्तानुसार, धर्मशाळेतील आयपीएल फ्रँचायझींच्या प्रवास योजनांवर परिणाम होऊ शकतो. धर्मशाळा विमानतळ सध्या बंद आहे. तथापि, पंजाब आणि दिल्ली कॅपिटल्सचे संघ आधीच धर्मशाळेत उपस्थित आहेत. या कारवाईनंतर, बीसीसीआयने म्हटले आहे की या राजकीय आणि लष्करी परिस्थितीचा स्पर्धेवर कोणताही परिणाम होणार नाही.
ऑपरेशन सिंदूर आयपीएल २०२५ परिणाम होणार का?
🚨 VENUE UPDATE FOR IPL 2025🚨
– Mumbai Indians vs Punjab Kings match likely to be shifted to DY Patil Stadium or Brabourne Stadium from Dharmasala. [News18 Cricket]#IPL2025 #MIvsPBKS @mipaltan @PunjabKingsIPL pic.twitter.com/Igkm3JTB5z
— RO_KO fanclub🏏 (@MohammadFa83199) May 7, 2025
आयपीएलचा सध्याचा हंगाम त्याच्या वेळापत्रकानुसार सुरू राहील. बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने या संदर्भात सांगितले की, आम्ही सध्या सरकारच्या सल्ल्याची वाट पाहत आहोत. सध्या चंदीगड विमानतळही बंद असल्याने पर्याय नाही. आपण काय करता येईल ते पहावे लागेल. दोन संघ आधीच येथे आहेत आणि मुंबई इंडियन्स ११ मे रोजी होणाऱ्या सामन्यासाठी प्रवास करणार होते. सर्वात जवळचा पर्याय दिल्ली विमानतळ आहे, परंतु त्यासाठी संघांना लांबचा प्रवास करावा लागेल. आम्ही सरकारी सल्ल्याचे निरीक्षण करत आहोत आणि त्यानुसार निर्णय घेऊ.
हेही वाचा – Mock Drill in India: CSK – KKR यांच्यातील सामना संकटात? ब्लॅकआऊट झाले तर काय होणार? जाणून घ्या
१० मे पर्यंत अनेक विमानतळ बंद –
भारतीय सशस्त्र दलांनी केलेल्या या हल्ल्यांनंतर, जम्मू, श्रीनगर, लेह, जोधपूर, अमृतसर, जामनगर, चंदीगड, राजकोट आणि भूज ही प्रमुख विमानतळे १० मे पर्यंत बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. विमानतळ बंद झाल्यामुळे फ्रँचायझींच्या अडचणी वाढल्या आहेत. फ्रँचायझींना प्रवासाची खूप डोकेदुखी आहे. तथापि, सध्या आयपीएलच्या आयोजनात आणि वेळापत्रकात कोणताही मोठा बदल दिसून येत नाही. आता पुढे काय निर्णय होतो ते पाहूया.





