पाकिस्तानमध्ये हिंदू मुलीच्या हत्येप्रकरणी नागरिकांचे आंदोलन

कराची – गेल्या कित्येक दिवसांपासून पाकिस्तानातील अल्पसंख्याकांवर अत्याचार होत आहेत. अशाच प्रकारची एक घटना समोर आली आहे. सिंध प्रांतातील लरकाना येथील चंदका वैद्यकीय महाविद्यालयात शिकणारी एक हिंदू मुलगी मंगळवारी रात्री मृतावस्थेत सापडली होती. या घटनेविरोधात पाकच्या नागरिकांनी राजधानी कराचीमध्ये रस्त्यावर आंदोलन केले आहे.
Pakistan: People staged protest on the streets of Karachi against the alleged murder of a Sindhi Hindu girl, Namrita Chandani yesterday. Namrita was found with a rope tied to her neck in Larkana, Sindh. pic.twitter.com/HuOi6E6Dcj
— ANI (@ANI) September 18, 2019
दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार या मुलीचे नाव नम्रता चांदनी असून ती बीडीएसची विद्यार्थिनी होती. तिच्यावर कथितरीत्या धर्मांतरण करण्यासाठी दबाव आणला जात होता. तिची हत्या झाल्याचे तिच्या नातेवाईकांचे म्हणणे आहे. त्यांनी या प्रकरणी कसून चौकशी करण्यात यावी, अशी मागणी केली आहे
या घटनेवर प्रतिक्रिया देताना, दिल्ली शीख गुरुद्वारा प्रबंधक समितीचे प्रमुख मनजिंदर सिंह सिरसा यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी या प्रकरणात लक्ष घालावे, अशी मागणी केली आहे. पाक पंतप्रधानांनी अल्पसंख्याकांचे बळजबरीने धर्मांतरण केले जाऊ नये, यासाठी असे करणाऱ्या लोकांविरोधात कडक पावले उचलावीत, असे म्हटले आहे. येथे मानवाधिकारांचे हनन होत असताना इम्रानसाहेब आपण गप्प का, असा सवाल सिरसा यांनी ट्विटमधून केला आहे. नोबेल पारितोषिक विजेती पाकिस्तानी मुलगी मलाला आणि संयुक्त राष्ट्रांनाही त्यांनी हे ट्विट केले आहे.
पाकिस्तान में हिंदू परिवार की नम्रता चाँदनी को धर्म परिवर्तन करने के लिए मजबूर किया गया; जब उसने मना किया तो उसका क़त्ल कर दिया जिसे पाक पुलिस ने आत्महत्या का नाम दिया
ये कैसी इंसानियत इमरान ख़ान साहब? @Malala @UN पाक में अल्पसंख्यकों के मानवाधिकारों के हनन पर चुप्पी क्यों@ANI pic.twitter.com/fp5SNc201R— Manjinder S Sirsa (@mssirsa) September 17, 2019
याआधीही पाकिस्तानात शीख आणि हिंदू मुलींचे जबरदस्तीने धर्मांतरण करण्यात आल्याच्या घटना घडल्या आहेत. याआधीही जगजीत कौर नावाच्या एका मुलीचे जबरदस्तीने धर्म परिवर्तन करण्यात आले होते. ही मुलगी अद्याप तिच्या घरी पोहोचलेली नाही, ही बाबही महत्त्वाची असून लक्ष वेधून घेणारी आहे.
Got details of 12 more girls from Minority section forcibly CONVERTED to Islam in Pakistan taking total number to 43
Shocking & Disgusting!!
This is a direct attack on freedom of religion in Pakistan and the issue needs to be addressed at global level @AmitShah Ji @DrSJaishankar pic.twitter.com/m4uR1F6Zbh— Manjinder S Sirsa (@mssirsa) September 4, 2019
पाकिस्तानमध्ये हिंदू, शीख, ख्रिश्चन अल्पसंख्याकांच्या जिवाला धोका असल्याचे वारंवार समोर आले आहे. या समाजातील मुलींचे बळजबरीने धर्मपरिवर्तन करून त्यांचे मुस्लीम पुरुषांसह विवाह करण्यात येत आहेत. दोन दिवसांपूर्वी सिंध प्रांतातील घोटकीमध्ये एका हिंदू मंदिरावर हल्ला झाला होता. यावरून येथील स्थिती भयानक असल्याचे स्पष्ट होत आहे. सिरसा यांनी आतापर्यंत बेपत्ता असलेल्या हिंदू मुलींची यादीही ट्विट केली आहे.





