लोकांना विश्वासात घ्यावं लागतं, नाहीतर काका कुतवल; अजित पवारांच्या बोलण्याचा नेमका अर्थ काय ?

Ajit Pawar | बारामती तालुक्यातील बोरकरवाडी येथे पाण्याचे पूजन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमात अजित पवार यांनी जानाई शिरसाई योजना, पुरंदर विमानळाच्या विषयावर भाष्य केले. जानाई योजनेचे पाणी बंद पाईपलाईनद्वारे बोरकरवाडी तलावात सोडण्यात आले आहे. त्या पाण्याचे पूजन अजित पवार यांच्या विशेष उपस्थितीत पार पडले. याप्रसंगी अजित पवार यांनी त्यांचे काका शरद पवार यांच्याबद्दल केलेल्या विधानाची जोरदार चर्चा केली जात आहे.
शरद पवार यांच्यासह अनेकांनी त्यांच्या काळात विकास करण्याचा प्रयत्न केला. पाण्याशिवाय काहीही होऊ शकत नाही, यासाठी आम्ही जनाई शिरसाई योजाना केली. १९९१ साली पिंपरी चिंचवडची लोकसंख्या ६ लाह होती, ती २०४१ ला ६१ लाख होईल, योजना करणं हे आमचं काम असलं तरी त्याचा मेंटेनन्स करणं हे तुमचं काम आहे ते व्यवस्थित झालं पाहिजे असे अजित पवार यावेळी बोलताना म्हणाले.
…नाहीतर काका कुतवल..
मी त्या रस्त्याबद्दल सांगितलं आहे. त्याबद्दल सहकार्य करा. मी बीडीओला सांगितलं आहे, तहसीलदाराला सांगितल आहे, पीआयला देखील सांगितल आहे. काकालाही म्हणलं विश्वासात घ्या, कारण काका लोकांना विश्वासात घ्यावं लागंत त्या शिवाय पुढे चालत नाही. अजित पवारांच्या या विधानाने उपस्थितीतांमध्ये एकच हशा पिकाला. नाहीतर काका कुतवल. नाहीतर लगेच तुम्ही म्हणाल दादा घसरले, दादा कोणावरही घसरत नाहीत. अशी मिश्किल टिप्पणी अजित पवार यांनी केली.





