‘जनतेला चिंता वाटू लागली आहे. महाराष्ट्राचा बिहार होतो की काय ?’ – रावसाहेब दानवे

मुंबई – नवनीत राणा आणि रवी राणा यांना शनिवारी रात्री खार पोलीस स्टेशनमध्ये भेटायला गेलेल्या भाजपचे नेते किरीट सोमय्या यांच्या गाडीवर जमावाने दगडफेक केली. या घटनेनंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. किरीट सोमय्यांनी राज्य सरकारवर सडकून टीका केली होती. त्यातच आज सकाळी किरीट सोमय्यांनी पत्रकार परिषदेत घेत सरकारवर गंभीर आरोप केले आहेत.
याबाबत केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी माध्यमांशी बोलतांना प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले,’घडलेल्या प्रकरणानंतर पोलिसांची बदनाम होत आहे. महाराष्ट्रातील जनतेला राज्यातील कायदा सुव्यवस्था बिघडलेल्याने चिंता वाटू लागली आहे की, महाराष्ट्राचा बिहार होतो की काय ? असा प्रश्न ही त्यांनी विचारला आहे.
ते पुढे म्हणाले,’देशामध्ये महाराष्ट्राच्या पोलिसांचे नाव आहे. मात्र सत्ताधारी तिन्ही पक्ष पोलिसांना बदनाम करण्याचे काम करत आहे.”





