पंचायत प्रतिनिधींना पेन्शन, ५० लाखांचा विमा अन्…; तेजस्वी यादवांकडून घोषणांचा वर्षाव

Tejashwi Yadav | बिहार विधानसभा निवडणुकीसाठी सध्या सर्वच राजकीय पक्षाकडून जोरदार तयारी सुरू करण्यात आली आहे. प्रचार सभांनी देखील वेग धरला असून आरोप-प्रत्यारोपाचे सत्र सुरू झाले आहे. याचदरम्यान अनेक पक्षांकडून मोठं मोठी आश्वासने देखील दिली जात आहे. यातच आता राष्ट्रीय जनता दलाचे (RJD) नेते तेजस्वी यादव यांनीही पत्रकार परिषदेत आश्वासने दिले आहे.
महाआघाडीची सत्ता आल्यास राज्यातील पंचायत प्रतिनिधींना पेन्शन आणि ५० लाख रुपयांचे विमा कवच दिले जाईल. आपली सत्ता आल्यास, पंचायत प्रतिनिधींचे मानधन दुप्पट केले जाईल. त्यांना पेन्शन आणि विमा कवचही दिले जाईल. याशिवाय, सोनार, न्हावी, लोहार आणि सुतार यांसारख्या पारंपरिक व्यवसायांशी संबंधित लोकांना स्वयंरोजगारासाठी एकरकमी ५ लाख रुपये दिले जातील,” असेही ते म्हणाले.
नितीश कुमार सरकारवर हल्ला चढवत तेजस्वी म्हणाले, “बिहार बदलासाठी तयार आहे. गेल्या २० वर्षांपासून राज्यात ‘खटारा’ सरकार आहे. आम्ही जेथे जात आहोत, तेथे सर्व जाती-धर्माचे लोक मोठ्या संख्येने समर्थन देण्यासाठी येत आहेत. जनता भ्रष्ट्राचार आणि गुन्हेगारीने त्रस्त असून, हे सरकार बदलण्यास उत्सुक आहे. बिहारमध्ये जाणूनबुजून कारखाने लागू दिले नाहीत. आपल्या १७ महिन्यांच्या काळात चांगले काम झाले होते, ‘चाचाजी पलटले’ (नितीश कुमार) नसते तर आणखी काम झाले असते. बिहारच्या जनतेने विद्यमान सरकारला २० वर्षे दिली. आम्ही केवळ २० महिने मागत आहोत,” असे त्यांनी म्हंटले. Tejashwi Yadav |
जीतन राम मांझी म्हणाले – मतदारांना भ्रमात टाकत आहे महागठबंधन
केंद्रीय मंत्री जीतन राम मांझी यांनी सांगितले की, हा माणूस काहीही करू शकत नाही आणि नेहमीच लोकांना फसवत आहे. लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी असेच एक कथा रचली की संविधान धोक्यात आहे आणि ही रणनीती यशस्वी झाली, ज्यामुळे एनडीएला कमी जागा मिळाल्या. ते पुन्हा अशीच कथा रचत आहेत. हे लोक जिंकणारे नाहीत, फक्त दिखाव्यासाठी बोलत आहेत. बिहारची जनता राजकीयदृष्ट्या जागरूक आहे आणि यावेळी त्यांच्या जाळ्यात अडकणार नाही,” असे म्हणत जीतन राम मांझी यांनी तेजस्वी यादव यांच्या वर निशाणा साधला. Tejashwi Yadav |
हेही वाचा :
“भारताने रशियाकडून होणारी तेल खरेदी थांबवली”; शी जिनपिंग यांच्या भेटीपूर्वी ट्रम्प यांचा मोठा दावा





