Mahayogi satyendra nath Video: अंगावर साचला बर्फ, हिमाचल प्रदेशच्या उंच पर्वतावर योगसाधनेत मग्न असलेला हा योगी कोण आहे? जाणून घ्या

mahayogi satyendra nath: सोशल मीडियावर एक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये एक तपस्वी बर्फावर तपश्चर्या करताना दिसत आहेत. तप करत असताना त्यांच्या अंगावर बर्फ पडत आहे आणि हा बर्फ त्यांच्या शरीराला झाकत आहे. उणे तापमानात आणि बर्फवृष्टी होत असताना योग साधनेत गुंतलेले हे योगी कोण आहेत याबाबत आता अनेकांना उत्सुकता लागली आहे. त्यांच्याबाबत थोडक्यात माहिती जाणून घेऊया..
![]()
हिमाचल प्रदेशातील उंच भागात सध्या बर्फवृष्टी सुरू आहे. अशा परिस्थितीत बर्फवृष्टीमध्ये एक महान योगी योगासने करत बसले आहे. या योगी पुरुषाच्या अंगावर फक्त धोतर आहे. गोठलेल्या बर्फावर ते बसले आहेत. त्यांच्या अंगावरही बर्फ पडत आहे. या योगी पुरुषाचे नाव आहे योगी सत्येंद्रनाथजी महाराज.
हिमाचल प्रदेशातील एका उंच पर्वतावर योगी सत्येंद्रनाथ महाराज ध्यान धारणा करत आहेत. त्यांच्या अंगावर बर्फ साचला आहे. pic.twitter.com/0cu5cGDg41
— Digital Prabhat (@Dainik_Prabhat) February 22, 2024
सत्येंद्रनाथ महाराज ज्या ठिकाणी ध्यान करत आहेत ते ठिकाण हे महादेवाला समर्पित असलेले ठिकाण असल्याचे सांगितले जात असून ते हिमाचल प्रदेशातील चुद्धर शिखरावर 11000 फूट उंचीवर असल्याचा दावा व्हायरल व्हिडीओतून केला जात आहे.
![]()
कोण आहेत महंत सत्येंद्र नाथ?
महंत सत्येंद्र नाथजी महाराज हे त्यांच्या योगा साधनेसाठी ओळखले जातात. ते पाणी, जोरदार वारा, पर्वत शिखर आणि बर्फवृष्टीमध्येही ध्यान धारणा करतात. असे सांगितले जाते की, सत्येंद्र नाथ हिमाचल प्रदेशातील कुल्लू जिल्ह्यातील लार्जी या छोट्या गावातील आहेत. वयाच्या अवघ्या 12 व्या वर्षी त्यांना गुरू ही पदवी मिळाली.
![]()
असे म्हणतात की त्यांच्या योगासने आणि तपश्चर्येमुळे महंत सत्येंद्र नाथ हे उंच डोंगर आणि उंच झाडांवर सहज चढू शकतात. कधी धबधब्याखाली तर कधी झाडांच्या फांद्याला लटकून ते योगासने करतात. महायोगी सत्येंद्र नाथ जी निसर्गात कुठेही योग करतात. धबधब्याच्या वाहत्या पाण्याच्या मध्यभागी उभे राहून साधना करतानाही अनेकदा त्यांना लोकांनी पाहिले आहे.
![]()





