Pune District : घुबड संवर्धनासाठी ‘पेडल फॉर आऊल्स’
Pune District : पिंगोरी येथे असलेले इला हॅबिटॅट हे इला फाऊंडेशनचे ग्रामीण भागातील वन्यजीव संशोधन केंद्र आहे. वन्यजीव संवर्धनाबाबत जनजागृती करणे हा या सायकल रॅलीमागील प्रमुख उद्देश होता;अशी माहिती इला फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ. सतीश पांडे यांनी दिली.

वाल्हे : शेती आणि मानवी जीवनात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या घुबडांचे अस्तित्व टिकविण्यासह त्यांच्या नैसर्गिक अधिवासाचे संरक्षण करण्यासाठी जनजागृती होणे काळाची गरज आहे. हीच गरज ओळखून ‘इला’ फाऊंडेशनच्या वतीने पुणे ते जयाद्री खोऱ्यातील पिंगोरी (ता.पुरंदर) येथील इला हॅबिटॅट आणि पुन्हा पुणे असा ‘पेडल फॉर आऊल्स’ हा अभिनव सायकल रॅली उपक्रम आयोजित करण्यात आला होता.कोजागिरी पौर्णिमेच्या निमित्ताने आयोजित या उपक्रमातून घुबड संवर्धन आणि पर्यावरण रक्षणाचा संदेश देण्यात आला.
पिंगोरी येथे असलेले इला हॅबिटॅट हे इला फाऊंडेशनचे ग्रामीण भागातील वन्यजीव संशोधन केंद्र आहे. वन्यजीव संवर्धनाबाबत जनजागृती करणे हा या सायकल रॅलीमागील प्रमुख उद्देश होता;अशी माहिती इला फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ. सतीश पांडे यांनी दिली.
पेडल फॉर आऊल्स’ या सायकल रॅलीला पुण्यातील सारसबाग येथून हिरवा झेंडा दाखवून सुरुवात करण्यात आली. उपक्रमाला बी क्रँक क्वेस्ट, अस्मिता वडेवाले (सासवड), चिंतामणी हॉस्पिटल (सासवड), ऑबिमा लाईफसायन्सेस प्रा. लि. (जेजुरी) यांचे सहकार्य लाभले. बोपदेव घाटाजवळ असलेल्या अस्मिता वडेवाले या उद्योगाचे प्रमुख विश्वास माहुरकर व प्रीतिभा माहुरकर यांनी सायकलस्वारांच्या गटाचे स्वागत केले.
सासवड येथे चिंतामणी हॉस्पिटलचे संचालक डॉ. संजय रावळ, डॉ. वांढेकर, डॉ. दिलीप वाघोलीकर यांनी सायकलस्वारांचे स्वागत केले. जेजुरी येथे विनय कुलकर्णी यांनीही स्वागत केले. इला फाऊंडेशनच्या वतीने राजकुमार पवार, राहुल लोणकर, सचिन शिंदे, माऊली खोमणे, उमाजी खोमणे, डॉ. मुरलीधर महाजन, डॉ. कौस्तुभ कुलकर्णी आदींनी सायकल रॅली यशस्वी करण्यासाठी विविध व्यवस्थांचे नियोजन केले होते. उपक्रमाची माहिती इला फाऊंडेशनचे संचालक डॉ. सतीश पांडे, सायकल रॅलीचे समन्वयक वैभव गंधे यांनी दिली.





