J&K Assembly Election: पीडीपीच्या जाहीरनाम्यात मोठी आश्वासने : मोफत वीज आणि 12 सिलिंडर, जुनी पेन्शन…

J&K Assembly Election 2024: जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीसाठी पुढील महिन्यात तीन टप्प्यात मतदान होत आहे. सर्वच राजकीय पक्ष निवडणुकीची तयारी करत आहेत. निवडणुकीच्या वातावरणात जम्मू-काश्मीर पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टी म्हणजेच पीडीपीने मेहबूबा मुफ्ती यांच्या उपस्थितीत आपला निवडणूक जाहीरनामा प्रसिद्ध केला. मेहबुबा मुफ्ती यांनी 12 महिन्यांत गरीबांना 12 सिलिंडर दिले जातील, असे आश्वासन दिले आहे.
मेहबूबा मुफ्ती यांचा पक्ष पीडीपीने यावेळच्या विधानसभा निवडणुकीसंदर्भात आपल्या निवडणूक जाहीरनाम्यात अनेक आश्वासने दिली आहेत.
#WATCH श्रीनगर: PDP प्रमुख महबूबा मुफ्ती ने कहा, “गठबंधन और सीट शेयरिंग बहुत दूर की बात है। अगर नेशनल कॉन्फ्रेंस और कांग्रेस हमारा एजेंडा अपनाने के लिए तैयार हैं, तो हम कहेंगे कि उन्हें सभी सीटों पर चुनाव लड़ना चाहिए, हम उनके पीछे चलेंगे क्योंकि मेरे लिए कश्मीर की समस्या को… pic.twitter.com/3ZTYlpvXaS
— ANI_HindiNews (@AHindinews) August 24, 2024
पीडीपीचा निवडणूक जाहीरनाम्यातील घोषणा –
1. प्रत्येक घराला 200 युनिट मोफत वीज देण्याचे वचन.
2. थकीत वीज बिलांचा एकरकमी निपटारा होईल.
3. प्रत्येक घराला मोफत पाणी देणार, वॉटर मीटर सिस्टीम बंद करणार.
4. बीपीएल (पीएचएच), पीएचएच आणि एनपीएच या श्रेणींमध्ये येणाऱ्या कुटुंबांना प्रति व्यक्ती 5 किलो रेशन मिळेल.
5. EWS श्रेणीतील लोकांना 12 महिन्यांत 12 मोफत सिलिंडर मिळतील.
6. साखर/केरोसीन PDS अंतर्गत परत आणले जाईल.
7. मालमत्ता खरेदी करणाऱ्या महिलेसाठी मुद्रांक शुल्क नाही.
8. सर्व घरांसाठी मालमत्ता कर काढून टाकला जाईल.
9. घरे बांधण्यासाठी EWS अंतर्गत समाविष्ट असलेल्या सर्व लोकांना सवलतीच्या दरात लाकूड उपलब्ध होईल.
10. वृद्धापकाळ निवृत्ती वेतन, विधवा निवृत्ती वेतन आणि अपंगांसाठी निवृत्तीवेतन यांसारख्या सामाजिक सुरक्षा योजनांतर्गत रक्कम 1000 रुपयांवरून 2000 रुपये करण्यात येईल.
11. J&K बँकेच्या कर्ज ग्राहकांसाठी OTS योजनेचे पुनरावलोकन केले जाईल.
यादरम्यान पीडीपी प्रमुख मेहबूबा मुफ्ती म्हणाल्या की, युती आणि जागावाटप खूप दूरची गोष्ट आहे. जर नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेस आमचा अजेंडा स्वीकारण्यास तयार असतील तर आम्ही म्हणू की त्यांनी सर्व जागांवर निवडणूक लढवावी, आम्ही त्यांच्या मागे चालू कारण माझ्यासाठी काश्मीर समस्या सोडवणे इतर कोणत्याही गोष्टीपेक्षा महत्त्वाचे आहे.
पुढे म्हणाल्या की, याआधीही जेव्हा आम्ही युती केली तेव्हा आमचा एक अजेंडा होता, आम्ही भाजपशी युती केली तेव्हा आमचा एक अजेंडा होता, ज्यावर त्यांनी सहमती दर्शवली होती, परंतु नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेसची युती अजेंड्यावर होत नाही, ती जागावाटपावर होत आहे. आम्ही अशी कोणतीही युती करणार नाही ज्यामध्ये फक्त जागावाटपाची चर्चा असेल. आघाडी अजेंड्यावर असली पाहिजे आणि जम्मू-काश्मीरचा प्रश्न सोडवणे हा आमचा अजेंडा आहे.
भाजपने पीडीपीच्या जाहीरनाम्याला म्हटले कॉपी-पेस्ट –
जम्मू-काश्मीरचे माजी उपमुख्यमंत्री आणि भाजप नेते कविंदर गुप्ता यांनी पीडीपीच्या जाहीरनाम्यावर सांगितले की, ही नॅशनल कॉन्फरन्सच्या जाहीरनाम्याची कॉपी पेस्ट आहे. ते एकाच थाटातले आहेत, ते देशद्रोही आहेत. काँग्रेसही त्यांना पाठिंबा देत आहे.
त्यांना जम्मू-काश्मीरला पुन्हा नरक बनवायचा आहे, या सर्व मुद्द्यांवर आपण विचार करायला हवा, असेही ते पुढे म्हणाले. दगडफेक करणाऱ्यांना तुरुंगातून सोडवायचे आहे. हे स्पष्ट आहे की ते एकमेकांवर अवलंबून आहेत. काँग्रेसचा सफाया झाला होता, ते स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत.





