PDFA Futsal League : डेक्कन इलेव्हन, चेतक एफसी संघाची विजयी सलामी…

पुणे – पुणे जिल्हा फुटबॉल संघटना(पीडीएफए) यांच्या वतीने आयोजित पहिल्या पीडीएफए फुटसाल लीग स्पर्धेत साखळी फेरीत डेक्कन इलेव्हन, चेतक एफसी या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्धी संघाचा पराभव करून विजयी सलामी दिली. बावधन येथील हॉटफूट येथील मैदानावर आजपासून सुरू झालेल्या या स्पर्धेत साखळी फेरीत डेक्कन इलेव्हन संघाने बेकडिनो एफसी संघाचा १३-२ असा धुव्वा उडवत विजयी सलामी दिली.
विजयी संघाकडून राज मिश्रा(६,७,२३,२५ मि.)ने चार गोल, तर यश महापात्रा(१,५,१८ मि.), मैत्रेय रावल(२,३,१२ मि.), रोहन चित्राले(४,१४,३० मि.)यांनी प्रत्येकी तीन गोल केले. दुसऱ्या सामन्यात चेतक एफसी संघाने रियल पुणे युनायटेड संघावर ९-० असा पराभव केला. विजयी संघाकडून निखिल माळी(८,११,१३,१९ मि.)याने सर्वाधिक चार गोल केले.
Maheshwari Football League : ग्लॅडिएटर्सने पटकावले विजेतेपद…
याआधी स्पर्धेचे उदघाटन पुणे जिल्हा फुटबॉल संघटने(पीडीएफए)चे उपाध्यक्ष प्यारेलाल चौधरी आणि परेश शिवलकर यांच्या हस्ते करण्यात आले. निकाल: साखळी फेरी: दुर्गा स्पोर्टस अकादमी: ३(मेहुल गोपाल 8मि., नैनिश दुर्गा १६मि., नीरज माने ३७मि.) बरोबरी वि. सिटी एफसी पुणे: ३(प्रितेश बाबर ४मि., अथर्व रेवलकर ९मि., रोहित रावत १२मि.).





