PBKS vs MI : पंजाबचे ‘किंग्ज’ मुंबईला पाणी पाजत क्वालिफायर-१ मध्ये दाखल! जोश-प्रियांश ठरले गेमचेंजर

PBKS vs MI Punjab Kings reach Qualifier-1 in IPL 2025 : जोश इंग्लिश आणि प्रियांश आर्य यांच्या अर्धशतकांच्या जोरावर पंजाब किंग्जने मुंबई इंडियन्सचा सात विकेट्सने पराभव करून क्वालिफायर-१ मध्ये प्रवेश केला. आता दुसऱ्या संघाचा निर्णय मंगळवारी लखनौ सुपर जायंट्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यातील सामन्यातून होईल. सोमवारी खेळल्या गेलेल्या सामन्यात, नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी केल्यानंतर, मुंबईने २० षटकांत सात गडी गमावून १८४ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात, पंजाबने १८.३ षटकांत तीन गडी गमावून विजयावर शिक्कामोर्तब केला.
पंजाब किंग्ज क्वालिफायर-१ मध्ये दाखल –
श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली, पंजाब किंग्ज संघाने चालू हंगामात शानदार कामगिरी करत क्वालिफायर-१ मध्ये आपले स्थान निश्चित केले आहे. या संघाने चालू हंगामात १४ सामनांपैकी सामने जिंकले आहेत आणि फक्त चार सामने गमावले आहेत. ज्यामुळे पंजाबचा संघ १९ गुण आणि त्याचा ०.३७२ नेट रन रेट पॉइंट्स टेबलमध्ये अव्वल स्थानावर आहे. पंजाबच्या गोलंदाज आणि फलंदाजां दोघांनीही चांगली कामगिरी करत आहेत.
Sealing a Q1 spot in style 🤌
Captain Shreyas Iyer adds the finishing flair as #PBKS defeat #MI in Jaipur ❤
Scorecard ▶ https://t.co/Dsw52HOtga#TATAIPL | #PBKSvMI | @PunjabKingsIPL pic.twitter.com/x93pqi4hxn
— IndianPremierLeague (@IPL) May 26, 2025
जोश-प्रियांश ठरले गेमचेंजर –
Incredible Inglis 🔥
For coming up clutch with a match-winning knock in a big game, Josh Inglis is adjudged the Player of the Match 🙌
Scorecard ▶ https://t.co/Dsw52HOtga#TATAIPL | #PBKSvMI | @PunjabKingsIPL pic.twitter.com/fgFz7TzPkf
— IndianPremierLeague (@IPL) May 26, 2025
पंजाब किंग्जकडून प्रियांश आर्य आणि जोश इंग्लिश यांनी सामन्यात शानदार कामगिरी केली. या दोन्ही फलंदाजांनी अर्धशतके झळकावली आणि पंजाबला सामना जिंकून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. प्रियांशने ६२ (३५) धावा केल्या. तर इंग्लिशने ७३ (४२) धावा केल्या. कर्णधार श्रेयस अय्यरने २६ धावांचे योगदान दिले. मुंबई इंडियन्सचे गोलंदाज सामन्यात काही खास कामगिरी करू शकले नाहीत आणि ते वाईटरित्या अपयशी ठरले. संघाकडून मिचेल सँटनरने दोन आणि जसप्रीत बुमराहने एक विकेट्स घेतली.
हेही वाचा – PBKS vs MI : हार्दिक पंड्याने पंजाबविरुद्धच्या सामन्यात केला मोठा पराक्रम! पूर्ण केलं खास ‘त्रिशतक’
सूर्याच्या वादळी अर्धशतकावर फेरलं पाणी –
Consistent Surya Kumar Yadav spearheads #MI‘s charge with 57(39) 👏
🎥🔽 WATCH | #TATAIPL | #PBKSvMI | @mipaltan
— IndianPremierLeague (@IPL) May 26, 2025
त्तत्पूर्वी मुंबई इंडियन्सकडून सूर्यकुमार यादवने सामन्यात शानदार फलंदाजी केली आहे. त्याने ५७ (३९) धावांची खेळी खेळली आहे. त्याच्याशिवाय रायन रिकेल्टनने २७ आणि रोहित शर्माने २४ धावा केल्या. कर्णधार हार्दिक पड्याने २६ धावांची खेळी केली. शेवटी, नमन धीरने १२ चेंडूत २० धावा केल्या ज्यामध्ये दोन उत्तुंग षटकारांचा समावेश होता. या खेळाडूंमुळेच मुंबई संघ १८४ धावा करू शकला. पंजाब किंग्जकडून अर्शदीप सिंग, मार्को यान्सन आणि विजय कुमार वैशाख यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या.





