PBKS vs MI : मुंबई इंडियन्स क्वालिफायर २ च्या ‘या’ शापातून होणार का मुक्त? जाणून घ्या काय आहे शाप

PBKS vs MI Mumbai Indians’ Qualifier 2 Challenge in IPL 2025 : मुंबई इंडियन्सने आयपीएलचे पाच जेतेपदं पटकावली आहेत, परंतु एलिमिनेटर खेळल्यानंतर मुंबईने एकदाही जेतेपद जिंकलेले नाही. २०२५ च्या हंगामात, मुंबई इंडियन्सने एलिमिनेटर जिंकून क्वालिफायर २ मध्ये प्रवेश केला आहे, परंतु क्वालिफायर २ मध्ये मुंबई इंडियन्सचा ट्रॅक रेकॉर्ड फारसा चांगला नाही. एलिमिनेटर जिंकल्यानंतर संघाने कधीही क्वालिफायर २ सामना जिंकलेला नाही.
मुंबई इंडियन्सला क्वालिफायर २ बद्दल चिंता –
मुंबई इंडियन्सने आतापर्यंत चार वेळा क्वालिफायर २ चे सामने खेळले आहेत, परंतु तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की संघाने दोनदा विजय मिळवला आहे आणि दोन सामने गमावले आहेत. आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे जेव्हा जेव्हा संघ एलिमिनेटर जिंकून क्वालिफायर २ मध्ये पोहोचला आहे, तेव्हा त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. अशा परिस्थितीत, मुंबई इंडियन्ससाठी हा विक्रम खूपच त्रासदायक राहिला आहे.
मुंबईचा क्वालिफायर २ मधील कसा आहे रेकॉर्ड?
That feeling of victory. Simply perfect. 😍💙#MumbaiIndians #PlayLikeMumbai #TATAIPL #GTvMIpic.twitter.com/ihAKFGaTxK
— Mumbai Indians (@mipaltan) May 30, 2025
२०११ मधील हंगामापासून प्लेऑफची सुरूवात झाली. त्याच हंगामात, मुंबईने पहिल्यांदा एलिमिनेटर जिंकला आणि क्वालिफायर २ मध्ये प्रवेश केला, परंतु क्वालिफायर २ मध्ये संघाला पराभवाचा सामना करावा लागला. त्यानंतर, २०१३ मध्ये, मुंबई इंडियन्सने क्वालिफायर १ मध्ये चेन्नईकडून पराभव पत्करल्यानंतर क्वालिफायर २ मध्ये राजस्थान रॉयल्सचा पराभव केला. त्यानंतर, २०१७ मध्ये, क्वालिफायर १ मध्ये रायझिंग पुणे सुपर जायंट्सकडून पराभव पत्करल्यानंतर, त्यांनी क्वालिफायर २ मध्ये केकेआरचा पराभव केला होता.
हेही वाचा – Shahid Afridi : दुबईतील केरळ समुदायावर टीकेचा भडिमार; आफ्रिदीच्या स्वागताने वाद, VIDEO व्हायरल
त्याच वेळी, मुंबई इंडियन्सने २०२३ मध्ये एलिमिनेटर जिंकून दुसऱ्यांदा क्वालिफायर २ मध्ये प्रवेश केला होता. एमआयने एलिमिनेटरमध्ये लखनौ सुपर जायंट्सचा पराभव केला, परंतु मुंबई क्वालिफायर २ मध्ये गुजरात टायटन्सकडून पराभूत झाली. आता एलिमिनेटर जिंकल्यानंतर संघ पुन्हा क्वालिफायर २ मध्ये पोहोचला आहे? यावेळी त्यांचा सामना पंजाब किंग्जशी होणार आहे. जो पहिल्या क्वालिफायर सामन्यात आरसीबीकडून पराभूत झाला होता.
हेही वाचा – GT vs MI : साई-वॉशिंग्टनच्या फटकेबाजीमुळं बुमराह-जयवर्धनेची जुंपली, PHOTOS होतायेत व्हायरल
मुंबई इंडियन्सचा क्वालिफायर २ मधील ट्रॅक रेकॉर्ड:
- २०११ मध्ये एलिमिनेटर जिंकला पण दुसऱ्या क्वालिफायरमध्ये पराभूत झाला
- २०१३ मध्ये पहिल्या क्वालिफायरमध्ये पराभूत झाला पण दुसऱ्या क्वालिफायरमध्ये जिंकला
- २०१७ मध्ये पहिल्या क्वालिफायरमध्ये पराभूत झाला आणि दुसऱ्या क्वालिफायरमध्ये जिंकला
- २०२३ मध्ये एलिमिनेटर जिंकला पण दुसऱ्या क्वालिफायरमध्ये पराभूत झाला
- २०२५ मध्ये एलिमिनेटर जिंकला, दुसऱ्या क्वालिफायरमधील निकालाची प्रतिक्षा





