…त्यांच्या काळातील गृहमंत्री जामिनावर याचे पवारांना विस्मरण; केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्याकडून प्रत्युत्तर

पुणे – “केवळ राजकीय द्वेशापोटी माजी केंद्रीयमंत्री शरद पवार यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याविषयी व्यक्तव्य केल्याचे दिसून येते. त्यांनी केंद्राकडे लक्ष देण्यापेक्षा राज्यात ज्यांना गृहमंत्री केले होते, ते सध्या जामिनावर बाहेर आहेत, असे पवारांना विस्मरण झाले असावे,’ असे सूचक विधान केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी केले.
मोहोळ यांच्या वक्तव्यावरून पवार यांना एकप्रकारे राजकीय प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न भाजपकडून होत असल्याची राजकीय चर्चा आहे. सर्वोच्च न्यायालयाने “तडिपार केलेला माणूस देशाचा गृहमंत्री’ असे व्यक्तव्य माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी केले. या व्यक्तव्याबाबत केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांना विचारले असता, त्यांनी हे केवळ राजकीय द्वेशापोटी केलेले वक्त्यव्य आहे.
पवारांना ज्या सर्वोच्च न्यायालयाचा दाखला दिला, त्याच न्यायालयाने अमित शहा यांना निर्दोष मुक्त केले आहे. त्यामुळे पवारांनी केंद्रातील मंत्री, गृहमंत्री यांच्याकडे लक्ष देण्यापेक्षा राज्यांना ज्यांना गृहमंत्री बनविले ते वसुलीच्या गुन्ह्यात १३ महिने जेलमध्ये होते. आता ते केवळ जामिनावर बाहेर आले आहेत. याचा पवारांना विसर पडला आहे’ असे मोहोळ यांनी सांगत एकप्रकारे सूचक व्यक्तव्य केल्याची चर्चा आहे.





