Pimpri : पवन शिनगारे यांची प्रजासत्ताक दिनाच्या परेडसाठी निवड

लोणावळा : लोणावळा महाविद्यालयातील प्राध्यापक डॉ. पवन रामू शिनगारे यांची २६ जानेवारी २०२५ रोजी दिल्ली येथे प्रजासत्ताक दिनी होणाऱ्या पथसंचालनाकरिता महाराष्ट्र संघनायक म्हणून निवड झाली आहे.
डॉ. पवन शिनगारे हे मागील १० वर्षांपासून लोणावळा महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनाचे युनिट यशस्वीपणे चालवित आहेत. डॉ. शिनगारे यांच्या मार्गदर्शनाखाली कु. जयवंत दळवी या विद्यार्थ्याची २६ जानेवारी २०२३ मध्ये कर्तव्य पथावरील संचालानामध्ये निवड झाली होती.
यानंतर आता डॉ. शिनगारे यांची संघनायक म्हणून निवड झाल्यामुळे लोणावळा महाविद्यालयाच्या शिरपेचात आणखीन एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.
लोणावळा एज्युकेशन ट्रस्टचे पदाधिकारी व विश्वस्त, वरिष्ठ व कनिष्ठ महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर तसेच महाविद्यालायचे आजी-माजी विद्यार्थी यांनी डॉ. पवन शिनगारे यांना कर्तव्य पथावरील संचलानाकरिता शुभेच्छा दिल्या.





