Pimpri : घोरावडेश्वर डोंगरावर 31डिसेंबरला गस्त वाढणार

पिंपरी : घोरावडेश्वर डोंगरावर 31 डिसेंबरला वर्षाअखेरीच्या निमित्ताने अनेकजण रस्त्याच्या कडेने, दारुपार्टी करतात. आग पेटवतात यामुळे वणवे लागतात. हे टाळण्यासाठी नेहमीपेक्षा जास्त संख्येने निसर्ग मित्र व वनविभागाकडील कर्मचारी गस्त घालणार आहेत.
वनविभागाच्या जागेत कोणी पार्टी करताना आढळले. मादक व ज्वलनशील वस्तू घेऊन विनापरवाना प्रवेश केल्याचा कारणांवरून कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे.
31 डिसेंबर रोजी तसेच यापुढे कधीही रस्त्याच्या कडेने, जंगलात, झाडांच्या आडोशाला पार्टी करु नये. अशा स्वरुपाची पार्टी करणे हा कायद्याने गुन्हा असून कोणी आढळून आल्यास संबंधित विभागाकडून कायदेशीर कारवाई केली जाईल.
त्यासाठी घोरावडेश्वर परिसरात 31 डिसेंबर रोजी निसर्ग मित्र व वनपाल गस्त घालणार असल्याची माहिती निसर्ग मित्र विभागाचे कार्याध्यक्ष भास्कर रिकामे यांनी दिली.





