पितृसत्ता ही डाव्यांनी निर्माण केलेली संकल्पना; निर्मला सितारामन यांनी व्यक्त केले मत
Updated On:

बंगळुरू : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी पितृसत्ताबाबत आपले मत मांडले आहे. त्या म्हणाल्या की, जर पितृसत्ता भारतातील महिलांना त्यांच्या इच्छा पूर्ण करण्यापासून रोखत असेल तर इंदिरा गांधी पंतप्रधान कशा होऊ शकतात? त्यांनी शनिवारी सीएमएस बिझनेस स्कूल, बंगळुरू येथे विद्यार्थ्यांशी संवाद साधताना ही माहिती दिली.
महिला सक्षमीकरणावर विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना सीतारामन म्हणाल्या की, पितृसत्ता ही कल्पना डाव्या पक्षांनी तयार केली होती. महिलांनी आकर्षक गुंतागुंतीच्या शब्दांच्या जाळ्यात अडकू नये, असा सल्ला सीमारामन यांनी दिला.
जर तुम्ही स्वतःसाठी उभे राहून तर्कशुद्धपणे बोललात तर पितृसत्ता तुम्हाला तुमची स्वप्ने साध्य करण्यापासून रोखू शकत नाही. मात्र, महिलांसाठी पुरेशा सुविधा उपलब्ध नसून बदलाची गरज असल्याचे त्यांनी मान्य केले.





