पाथलगडीतून नव्हे पूर्ववैमनस्यातून खून
Updated On:

रांची : झारखंडमध्ये प. सिंगभूम जिल्ह्यात झालेल्या सात जणांच्या हत्या पाथलगडी चळवळीतून झाल्या नसून दोन्ही कुटुंबातील वादातून झाल्याचे तपासात समोर येत आहे.
जमेश बूध (30), इटवा बुध (27) लोंबा बुध (25), कोजे टोपनो (23), निर्मल बुध (25), जबरा बुध (22) आणि बोबस लोमगा यांची हत्या करण्यात आली आहे.
पाथलगडी चळवळीचा या हत्येशी काहीही संबंध नाही. दोन कुटुंबाच्या वादातून या हत्या झाल्या होत्या. या कुटुंबाने सरपंचाच्या वडीलांची यापुर्वी हत्या केली होती. त्याचा बदला म्हणून हे हत्याकांड घडवण्यात आल्याचे अतिरिक्त पोलिस महासंचालक मुरारी लाल मीना यांनी सांगितले.
टॅग्स:





