WTC Final 2025 : पॅट कमिन्सचा मोठा धमाका! ‘हा’ खास पराक्रम करणारा ठरला जगातील पहिलाच कर्णधार

पॅट कमिन्सने आपल्या ६८व्या कसोटी सामन्याच्या १२६व्या डावात हा पराक्रम केला. पॅट कमिन्सने कर्णधार म्हणून कसोटी क्रिकेटमध्ये नव्यांदा वेळा ५ विकेट घेण्याचा पराक्रम केला. यामुळे तो कसोटी क्रिकेटमध्ये कर्णधार म्हणून संयुक्तपणे दुसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक ५ विकेट्स घेणारा गोलंदाज ठरला. त्याने हा पराक्रम करत रिची बेनॉड यांची बरोबरी केली. कसोटी क्रिकेटमध्ये कर्णधार म्हणून सर्वाधिक ५ विकेट घेण्याचा विक्रम इम्रान खानच्या नावावर आहे. इम्रान खानने १२ वेळा ५ विकेट्स घेण्याचा पराक्रम केला होता.
कर्णधार म्हणून कसोटीत सर्वाधिक वेळा ५ विकेट्स घेणारे खेळाडू :
Most Fifers in Test cricket by a Captain:
12- Imran Khan (Pakistan)
9- Richie Benaud (Australia)
9- Pat Cummins (Australia)
8- Bishen Singh Bedi (India)
7- Courtney Walsh (West Indies)#WTC2O25Final #PatCummins pic.twitter.com/dyBprdl6Sy
— Saptak Sanyal (@SanyalwithStats) June 12, 2025
- १२ – इम्रान खान
- ९ – पॅट कमिन्स*
- ९ – रिची बेनॉड
- ८ – बिशन सिंग बेदी
- ७ – कोर्टनी वॉल्श
- ७ – जेसन होल्डर
हेही वाचा – WTC Final 2025 : पॅट कमिन्सने डब्ल्यूटीसी फायनलमध्ये रचला इतिहास; बुमराह-विलिसचे विक्रम धुळीस!
पॅट कमिन्स ठरला जगातील पहिला कर्णधार –
🚨 HISTORY BY PAT CUMMINS 🚨
– Pat Cummins becomes the first bowler to take Six-wicket haul in WTC final 🥶 pic.twitter.com/bdp2wBgRBf
— Johns. (@CricCrazyJohns) June 12, 2025
पॅट कमिन्स हा जगातील पहिला कर्णधार ठरला आहे, ज्याने आयसीसी स्पर्धेच्या अंतिम सामन्यात ५ विकेट्स घेण्याचा पराक्रम केला आहे. आयसीसी अंतिम सामन्याच्या इतिहासात यापूर्वी असा कोणताही विक्रम झाला नव्हता. यावरून ऑस्ट्रेलियन कर्णधाराचा हा विक्रम किती मोठा आहे याचा अंदाज येऊ शकतो. कमिन्स हा कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील तिसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक विकेट्स घेणारा कर्णधार आहे. त्याच्यापुढे फक्त रिची बेनॉड आणि इम्रान खान आहेत. आणखी ३ विकेट्स घेतल्यास तो दुसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक विकेट्स घेणारा कर्णधार बनेल.
कसोटी क्रिकेटच्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारे कर्णधार :
- इम्रान खान – १८७
- रिची बेनॉड – १३८
- पॅट कमिन्स – १३६
- गॅरी सोबर्स – ११७
- डॅनियल व्हेटोरी – ११६
- कपिल देव – १११





