टेक्सासमधील चर्चवर गोळीबार; धर्मगुरू ठार, दोन जण जखमी

ह्युस्टन – अमेरिकेतील पूर्व टेक्सास प्रांतात एका चर्चवर झालेल्या गोळीबारात धर्मगुरू मरण पावले. तर अन्य दोघेजण जखमी झाले. टेक्सासच्या अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली.
स्टारविल मेथोडिस्ट चर्चमधील स्वच्छतागृहामध्ये एक व्यक्ती लपलेली धर्मगुरूंनी बघितले. संभाव्य हल्ल्याची कल्पना आल्याने धर्मगुरूंनी स्वसंरक्षणासाठी स्वतःचे पिस्तुल काढले. मात्र हल्लेखोराने त्यांच्याकडील पिस्तुल हिसकावले आणि त्यांच्यावरच गोळीबार केला, असे स्मिथ काउंटीचे शेरीफ लॅरी स्मिथ यांनी पत्रकार परैषदेत सांगितले.
या हल्लेखोराच्या गोळीबारात आणखी एक जण जखमी झाला असून आणखी एक जण खाली पडल्याने जखमी झाला आहे. या गोळीबाराच्या घटनेनंतर हल्लेखोर चर्चमध्येच लपून बसला असल्याच्या संशयावरून पोलिसांनी शनिवारी रात्री जवळच्या दाट जंगलामध्ये त्याचा शोध घेण्यास सुरुवात केली.
या हल्लेखोराने धर्मगुरूंचेच वाहन चोरले होते. पोलिसांनी पाठलागकरून जवळच्या हॅरिसन काउंटीतून त्याला अटक केली असून घटनेचा तपास सुरू आहे.





