स्वयंघोषित येशू-येशू पाद्री बजिंदर सिंग अत्याचार प्रकरणात दोषी ; न्यायालयाने ठोठावली जन्मठेपेची शिक्षा, ७ वर्षांनंतर न्याय

Pastor Bajinder Singh । स्वयंघोषित येशु-येशु पाद्री बजिंदर सिंहला मोहालीच्या पोक्सो न्यायालयाने मोठा झटका दिला आहे. न्यायालयाने बाजिंदरला लैंगिक अत्याचार प्रकरणी जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. गेल्या आठवड्यात, न्यायालयाने २०१८ च्या लैंगिक अत्याचार प्रकरणात पाद्री बजिंदर सिंग यांना दोषी ठरवले होते. त्यावर आज शिक्षा सुनावण्यात आली आहे.
पीडितेची सुरक्षेची मागणी Pastor Bajinder Singh ।
मोहालीच्या पोक्सो न्यायालयात ७ वर्षांपूर्वीच्या एका प्रकरणावर सुनावणी पार पडली. यात पाद्री बजिंदरसिंह दोषी आढळून आला. या प्रक आज सुणवणी झाली. दरम्यान, या प्रकरणातील पीडितेने निकालावर प्रतिक्रिया देताना म्हटले आहे की, ‘तो (बजिंदर) मनोरुग्ण आहे आणि तुरुंगातून बाहेर आल्यानंतरही तोच गुन्हा करेल, म्हणून मला तो तुरुंगातच राहावा असे वाटते.’ आज अनेक मुली (बळी) जिंकल्या आहेत. आमच्यावर हल्ला होण्याची शक्यता असल्याने मी पंजाबच्या डीजीपींना आमची सुरक्षा सुनिश्चित करण्याची विनंती करते.” असेही त्यांनी म्हटले आहे.
या प्रकरणातील अंतिम सुनावणीच्या दिवशी, पीडितेचे वकील अनिल सागर यांनी बजिंदरला कठोर शिक्षा देण्याची मागणी न्यायालयाकडे केली होती. त्यांनी म्हटले होते की, ‘बलात्काराच्या गुन्ह्यासाठी प्रकरणाच्या परिस्थितीनुसार १० ते २० वर्षांच्या शिक्षेची तरतूद आहे. या प्रकरणात, मी न्यायालयाला दोषी बजिंदरला सर्वोच्च शिक्षा देण्याची मागणी करतो कारण ही व्यक्ती धर्माच्या नावाखाली लोकांना दिशाभूल करत होती. त्याला कडक शिक्षा देणे आवश्यक आहे. मला आशा आहे की यानंतर, अशा गुन्ह्यांना सामोरे गेलेल्या मुली पुढे येतील आणि अत्याचारांबद्दल बोलतील.” असे म्हटले.
बजिंदरविरुद्धचा संपूर्ण खटला काय होता? Pastor Bajinder Singh ।
हे प्रकरण २०१८ चे आहे, जेव्हा झिरकपूर येथील एका महिलेने पोलिस तक्रार दाखल केली होती की, बजिंदरने तिला परदेशात सेटल करण्याच्या बहाण्याने तिचे लैंगिक शोषण केले. महिलेने असा दावा केला होता की बजिंदरने त्याच्या फोनवर तिचा एक खाजगी व्हिडिओ रेकॉर्ड केला होता आणि जर ती त्याच्या मागण्या मान्य केली नाही तर तो व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करण्याची धमकी दिली होती. या प्रकरणात बजिंदर जामिनावर बाहेर होता. ही घटना घडली तेव्हा पीडिता अल्पवयीन होती. त्यामुळे हा खटला POCSO न्यायालयात सुरू होता. पीडितेच्या तक्रारीवरून, झिरकपूर पोलिसांनी चमत्कारांद्वारे आजार बरे करण्याचा दावा करणाऱ्या जालंधरचे पाद्री बजिंदर सिंग यांच्यासह सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला होता.
या प्रकरणातपाद्रीसोबतच अकबर भाटी, राजेश चौधरी, सुचा सिंग, जतिंदर कुमार, सितार अली आणि संदीप उर्फ पहेलवान यांची नावे आहेत. त्यांच्याविरुद्ध POCSO कायदा आणि भारतीय दंड संहितेच्या अनेक कलमा अंतर्गत एफआयआर दाखल करण्यात आला. पुराव्याअभावी न्यायालयाने इतर आरोपींना निर्दोष सोडले. पोलिसांनी आरोपपत्रात म्हटले होते की, ताजपूर गावात असलेल्या ‘द चर्च ऑफ ग्लोरी अँड विस्डम’चे पास्टर बजिंदर सिंग यांनी जालंधरमध्ये अल्पवयीन पीडितेसोबत गैरकृत्य केले होते. बजिंदरने तिचा फोन नंबर घेतला आणि अश्लील मेसेज पाठवू लागला. तो तिला चर्चमधील त्याच्या केबिनमध्ये एकटे बसवू लागला, जिथे तो पीडितेशी गैरवर्तन करायचा. कपूरथळा पोलिसांनी या प्रकरणात विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन केले होते. जुलै २०१८ मध्ये लंडनला जाणाऱ्या विमानात चढण्याचा प्रयत्न करत असताना बजिंदरला दिल्ली विमानतळावर अटक करण्यात आली.





