पुणे | पर्वती पायथा, दांडेकर पूल, दत्तवाडीतील वीज गुल

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – शहरात पावसाची संततधार सुरू आहे. त्यातच सिंहगड रस्त्याकडील पर्वती पायथा, दांडेकर पूल व दत्तवाडी परिसरात रविवारी सकाळपासूनच विजेचा पुरवठा खंडित झाला. केबलमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने सर्वांचाच खोळंबा झाल्याची तक्रार नागरिक करत होते.
शास्त्रीनगर परिसरात केबलमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने वीजपुरवठा खंडित होता. विशेषत: पर्वती पायथा, दांडेकर पूल व दत्तवाडी परिसरात सुटीच्या दिवशी रविवारी सकाळपासून वीजपुरवठा बंद होता. त्यामुळे या परिसरातील वीजग्राहकांना मनस्ताप सहन करावा.
या संदर्भात परिसरातील नागरिकांना नेमके तांत्रिक बिघाड कुठे झाला आहे, त्याचा शोध सुरू असल्याची माहिती महावितरण कार्यालयाकडून दिली जात होती. मात्र, वीजपुरवठा कधी सुरु होणार आहे,
याची माहिती दिली जात नव्हती. त्यावरुन नागरिकांचा रोष वाढत होता. दरम्यान, केबलमध्ये तांत्रिक बिघाड पूर्ववत करण्यास सायंकाळी साडेसात वाजले. त्यानंतर वीजपुरवठा सुरळीत करण्यात आल्याची माहिती महावितरणच्या अधिकाऱ्यांकडून देण्यात आली.




