स्वप्नपूर्ती! ‘पारु’ मालिकेतील लोकप्रिय अभिनेत्रीने घेतलं हक्काचं घर, गृहप्रवेशाचे फोटो केले शेअर

Shweta Kharat | झी मराठीवरील ‘पारु’ ही मालिका सध्या प्रचंड गाजत आहे. टीआरपीच्या बाबतीतही लोकप्रिय मालिका पुढे आहे. या मालिकेतील पारू, आदित्य, अहिल्यादेवी पात्रांना प्रेक्षकांचे प्रचंड प्रेम मिळत आहे. शरयू सोनावणे, मुग्धा कर्णिक, प्रसाद जवादे आणि श्वेता खरात या कलाकारांची मालिकेत प्रमुख भूमिका आहे. मालिकेत अनुष्का हे पात्र साकारणाऱ्या श्वेता खरातने चाहत्यांनी आनंदाची बातमी दिली आहे.
श्वेता गेल्या अनेक वर्षांपासून टेलिव्हिजन विश्वात कार्यरत आहेत. अनेक लोकप्रिय मालिकांमध्ये तिने काम केले आहे. आता श्वेताने स्वतःच्या हक्काचे घर घेतले आहे. अभिनेत्रीने गृहप्रवेशाचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
श्वेता खरातने कुटुंबासोबत नवीन घरात गृहप्रवेश केला. यावेळी तिने पूजा देखील केले. सोशल मीडियावर शेअर केलेल्या फोटोमध्ये श्वेताचे आई, बाबा, भाऊ पूजा करताना दिसत आहेत.
View this post on Instagram
श्वेताच्या नवीन घराच्या पुजेला ‘लाखात एक आमचा दादा’ मालिकेतील सूर्या ही भूमिका साकारणार अभिनेता नितीश चव्हाण देखील उपस्थित होता. अभिनेत्रीने गृहप्रवेशाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केल्यानंतर आता चाहते व इतर कलाकारांकडून तिला शुभेच्छा दिल्या जात आहेत.
दरम्यान, अभिनेत्रीच्या कामाबद्दल सांगायचे तर सध्या ती ‘पारु’ या मालिकेत महत्त्वाची भूमिका साकारत आहे. ‘मन झालं बाजिंद’, ‘राजा रानीची गं जोडी’ या मालिकेतही काम केले आहे.





