Pune: तापकीर यांच्या प्रचारात महिलांचा सहभाग; बिबवेवाडी भागात मिळतोय प्रतिसाद

धनकवडी – खडकवासला मतदारसंघातील भाजप महायुतीचे अधिकृत उमेदवार व विद्यमान आमदार भिमराव अण्णा तापकीर यांच्या प्रचाराला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. बिबवेवाडी भागातील लेक टाऊन ते हस्तीपुरम आणि अप्पर तसेच चैत्रबन वसाहत, राजीव गांधीनगर या भागांतील महिलांनी एकत्र येऊन तापकीर यांचे औक्षण करून विजयाच्या शुभेच्छा दिल्या.
तापकीर यांनी धनकवडी भागातील प्रचार दौऱ्यात आगामी पाच वर्षांसाठी त्यांच्या विकास योजनांबाबत महत्त्वाचे विधान केले. “सहकारी गृहनिर्माण संस्था, मोठ्या सोसायट्या, ग्रामीण भागांच्या पायाभूत सुविधांच्या विकासासाठी आमदार निधी मोठ्या प्रमाणावर वापरणार आहे,” असे तापकीर यांनी जाहीर केले.
येत्या काळात खडकवासला मतदारसंघातील ग्रामीण भागाचा पाणीपुरवठा, जलसंधारण, सौरऊर्जा प्रकल्पांसह नागरी आणि औद्योगिक क्षेत्रासाठी विशेष योजना आणणार आहे. सोसायट्यांमध्ये अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून देणार आहे. ग्रामीण भागासह नागरी क्षेत्रात विकासाची नवी दिशा देण्याचा संकल्प आम्ही केला आहे.
या वेळी माजी नगरसेविका वर्षा तापकीर, अश्विनी भागवत, मोहिनी देवकर, आप्पासाहेब धावणे, संतोष फरांदे, विश्वास आहेर, युवराज रेणुसे, अभिषेक तापकीर, सचिन बदक, सागर साबळे, आनंद शिंदे, दत्ता सावंत, अंकुश सोनवले, महेश भोसले, सत्यवान कामठे, सतिश घाटे, उल्हास खुटवड, दादा देवकर, पांडुरंग भोसले, अंकुश कोकाटे उपस्थित होते.
“महिलांचा उस्फूर्त सहभाग हे तापकीर यांच्या जनाधाराचे द्योतक आहे. त्यांच्या पाठिंब्यामुळे मोठ्या फरकाने विजय निश्चित आहे. मतदारसंघाच्या विकासासाठी भाजप-महायुती कटीबद्ध आहे.” – विकास लवटे, प्रवक्ते, भाजप
“आगामी पाच वर्षांत सर्वाधिक आमदार निधी सहकारी गृहनिर्माण संस्था, मोठ्या सोसायट्या आणि ग्रामीण भागाच्या विकासासाठी वापरणार. मला चौथ्यांदा प्रतिनिधित्व करण्याची संधी द्यावी.” – भीमराव तापकीर, उमेदवार, भाजप-महायुती





