पार्थ पवारांची भाजप नेत्यासोबतची ‘भेट’ चर्चेत

मुंबई – महाराष्ट्रातील सध्याच्या वादग्रस्त विषयावरून वातावरण चांगलेच पेटलेले असताना अचानक शरद पवार आणि अमित शहा यांच्या गुप्त भेटीची बातमी झळकली आणि सगळेच कोमात गेल्यासारखे झाले आहे. ही बातमी ताजी असतांनाच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे कट्टर राजकीय विरोधक मानल्या जाणाऱ्या भाजपा नेत्याची पार्थ पवार यांनी भेट घेतली, या भेटीनं अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत. माजी मंत्री आणि भाजपा नेते हर्षवर्धन पाटील यांची पार्थ पवार यांनी इंदापूरच्या राहत्या घरी भेट घेतली. काही दिवसांपूर्वी हर्षवर्धन पाटील यांच्या काकीचं निधन झालं होतं. या पार्श्वभूमीवर हर्षवर्धन यांची सांत्वनपर भेट घेतली.
या भेटीनंतर भाजप समर्थक आणि भाजप विरोधक असा जोरदार सामना महाराष्ट्रात पेटलेला असतानाच थेट या भेटीमुळे बातमीवर नेमकी काय भावना व्यक्त करावी, हेच संबंधित पक्षाच्या नेत्यांना कळेनासे झाले.
भाजपा इंदापूर मतदारसंघातून हर्षवर्धन पाटील यांनी निवडणूक लढवली होती, मात्र यावेळी रा दरम्यान,राष्ट्रवादीचे दत्ता भरणे यांनी त्यांचा दुसऱ्यांदा पराभव केला. विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात अनेकदा अजित पवार आणि हर्षवर्धन पाटील यांचा कलगीतुरा पाहायला मिळत होता. निवडणुकीत दोन्ही नेत्यांनी एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी सोडली नव्हती. यातच एका कार्यक्रमाच्या निमित्ताने अजित पवार आणि हर्षवर्धन पाटील एकत्र आले होते, तेव्हा अजित पवार म्हणाले होते की, राजकारणात मतभेद असले पाहिजेत, पण मनभेद नकोत हा सिद्धांत खरा मानला तरी राजकारणाबाहेरही लोकांची एकमेकांशी मैत्री असू शकते ही वस्तुस्थिती मान्य केली पाहिजे.






