मुंब्रामध्ये २५ वर्ष जुन्या इमारतीचा काही भाग कोसळला; एका महिलेचा मृत्यू

Mumbra Building Collapse | ठाणे जिल्ह्यातील मुंब्रामध्ये इमारतीचा काही भाग कोसळल्याने एका वृद्ध महिलेचा मृत्यू झाला आहे. तर एक महिला जखमी झाली आहे. या घटनेनंतर बचाव पथकाने आणि स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत बचाव कार्य सुरु केलं आहे.
मुंब्रातील लकी कंपाऊंड येथील डी विंग ग्राउंड प्लस ही तीन माळ्याची बिल्डिंग असून ती 25 वर्षे जुनी आहे. घटनेपूर्वी दोन महिला रात्रीच्या सुमारास या इमारतीच्या बाजूने जात असताना त्यांच्यावर टेरेसवरील रूम नंबर 404 चा बाहेरील सज्जाचा भाग कोसळला.
या घटनेत दोन्ही महिला जखमी झाल्या असून त्यांना तातडीने नजीकच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. नाहीद जैनउद्दीन जमाली (वय ६२) या जखमी झालेल्या महिलेला स्थानिक नागरिकांनी मुंबईतील बिलाल हॉस्पिटल येथे दाखल केले असता डॉक्टरांनी महिलेला मृत घोषित केले.
तर इलमा जेहरा जमाली (वय २६) काळसेकर हॉस्पिटल, मुंबई या ठिकाणी उपचारासाठी दाखल केले आहे. या दोन्ही महिला मुंब्रा येथील कौसा कब्रस्तान दौलत नगर येथे राहणाऱ्या आहेत. रात्रीच्या सुमारास फेरफटका मार्ट असताना ही घटना घडल्याचे सांगण्यात आले आहे. Mumbra Building Collapse |
दरम्यान, सुरक्षेच्या कारणास्तव इमारतीमधील सर्व रूम रिकामी करण्यात आले आहेत आणि त्या इमारतींना सील करण्यात आले आहेत.
हेही वाचा:
शेअर बाजाराची चांगली सुरुवात ! सेन्सेक्स ३०० अंकांनी वाढला ; ‘या’ शेअर्समध्ये वाढ





