Parliament Winter Session । राज्यसभेत आज सभापतींविरोधातील अविश्वास प्रस्तावावर प्रचंड गदारोळ झाला. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी अध्यक्ष जगदीप धनखड यांच्यावर नियमानुसार सभागृह चालवत नसल्याचा आरोप केला. त्यांच्या या आरोपाला उपराष्ट्रपतींनी उत्तर दिले. अध्यक्ष जगदीप धनखड यांनी काँग्रेसला प्रत्युत्तर देताना, “शेतकऱ्याचा मुलगा या खुर्चीवर कसा बसला आहे, याचे तुम्हाला दुःख आहे. मी देशासाठी जीव देईन, पण झुकणार नाही.” असे म्हटले. विरोधकांना माझ्याविरोधात प्रस्ताव आणण्याचा अधिकार Parliament Winter Session । अविश्वास प्रस्तावावर सभापती जगदीप धनखड म्हणाले की, “विरोधी पक्षांनी सांगितले की तुम्ही माझ्याशी बोला. ते म्हणाले, “मुख्य विरोधी पक्षाने सभापतींच्या विरोधात ही तक्रार म्हणून मांडल्याने मला वैयक्तिक दुखापत झाली आहे. त्यांना माझ्याविरोधात प्रस्ताव आणण्याचा अधिकार आहे, मात्र हे घटनात्मक तरतुदींपासून विचलन आहे. सभापतींच्या विरोधात दररोज तक्रारी येत आहेत. ” सभापती धनखड म्हणाले, “विरोधकांनी संविधानाची पायमल्ली केली. मी माझ्या शपथेवर ठाम राहीन. मी तुम्हाला संविधानाच्या नावाने आवाहन करतो. माझ्या दालनात माझ्याशी बोला. सभागृहनेत्यालाही विनंती आहे. आपण सर्वजण मिळून एकत्र काम करू, मी आदर देण्यात कमी पडलो नाही.”असे त्यांनी यावेळी म्हटले. मीही मजुराचा मुलगा – खरगेंचे प्रत्युत्तर Parliament Winter Session । तर सभापतींच्या आरोपांना काँग्रेस नेते खरगे यांनी सडेतोड उत्तर दिले आहे. त्यांनी, “तुम्ही शेतकऱ्याचा मुलगा असाल तर मी देखील एका मजुराचा मुलगा आहे. सभापतींवर पक्षपातीपणाचा आरोप करत ते म्हणाले, “तुम्ही भाजप खासदारांना बोलण्याची संधी देत आहात, तर काँग्रेसला नाही. आम्ही तुमची स्तुती ऐकायला आलो नाही.” असेही त्यांनी यावेळी म्हटले. काँग्रेस खासदार खरगे पुढे म्हणाले, “सभागृह चालवण्याची जबाबदारी अध्यक्षांची आहे. सभापती विरोधी खासदारांचा अपमान करतात. जो सभापती माझा आदर करत नाही, तो मी तुमचा कसा आदर करू? तुम्ही माझा अपमान करत आहात.” असा आरोप यावेळी खरगे यांनी केला. हेही वाचा ‘एक देश एक निवडणूक’ अंमलबजावणी होणार का? ; लोकसभा-राज्यसभेतील नंबर गेममुळे मोदी सरकार अडचणीत ? जाणून घ्या कोणाचे किती खासदार प्रियांका गांधी लोकसभेत पहिल्यांदाच करणार भाषण ; संविधानावरील चर्चेत विरोधीपक्षाद्वारे करणार सुरुवात