राज्यसभेत अभिषेक मनु सिंघवी यांच्या आसनाखाली सापडला नोटांचा गठ्ठा ; सभापती म्हणाले,’ही गंभीर बाब…’

Parliament Winter Session । संसदेत सध्या हिवाळी अधिवेशन सुरु आहे. सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात सतत शाब्दिक हल्ले सुरु असताना आज आणखी एक नवा वाद समोर आला. काँग्रेसच्या आसनाखाली चलनी नोटांचा गठ्ठा सापडल्यानंतर राज्यसभेत प्रचंड गदारोळ झाला. याविशषयी बोलतानाखुद्द सभापतींनी ही गंभीर बाब असून त्याची चौकशी करण्यात येत असल्याचे सभागृहात सांगितले.
शुक्रवारी अध्यक्ष जगदीप धनखड यांनी या नोटांच्या गठ्ठयाविषयी माहिती दिली, ‘काल (गुरुवारी) सभागृह तहकूब झाल्यानंतर सुरक्षा अधिकाऱ्यांनी आम्हाला माहिती दिली की सीट क्रमांक 222 मधून रोख रक्कम सापडली आहे. ही जागा तेलंगणाचे खासदार अभिषेक मनू सिंघवी यांना देण्यात आली आहे. या प्रकरणाचा तपास नियमानुसार व्हायला हवा आणि तोही केला जात आहे.” असे सभापतींनी यावेळी सांगितले.
अध्यक्षांनी नोटा मिळाल्याचे सांगताच विरोधी पक्षाच्या खासदारांनी गदारोळ सुरू केला. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले, ‘जोपर्यंत या प्रकरणाचा तपास सुरू आहे आणि सर्वकाही स्पष्ट होत नाही तोपर्यंत तुम्ही (अध्यक्षांनी) त्यांचे (अभिषेक मनू सिंघवी) नाव बोलायला नको होते.’ खरगे यांच्या वक्तव्यावर सत्ताधारी पक्षाच्या खासदारांनी गदारोळ केला. त्यावर खरगे म्हणाले की, अशी चिखलफेक करून देशाची बदनामी केली जात आहे. तुम्ही (अध्यक्ष) कोणत्याही विशिष्ट व्यक्तीचे नाव आणि जागा याबद्दल कसे म्हणू शकता? खरगे यांच्या आरोपांवर सभापती म्हणाले की, “ती कोणत्या जागेवर सापडली आणि ती कोणाला दिली गेली हे त्यांनी सांगितले आहे”.
Heard of it first time now. Never heard of it till now! I carry one 500 rs note when I go to RS. First time heard of it. I reached inside house at 12:57 pm and house rose at 1 pm then I sat in canteen till 1:30 pm then I left parl!
— Abhishek Singhvi (@DrAMSinghvi) December 6, 2024
ही अत्यंत दुर्दैवी आणि गंभीर समस्या – जेपी नड्डा Parliament Winter Session ।
भाजपचे प्रमुख आणि केंद्रीय आरोग्य मंत्री जेपी नड्डा म्हणाले, ‘ही अत्यंत दुर्दैवी आणि गंभीर समस्या आहे. हा सभागृहाच्या प्रतिष्ठेवरचा हल्ला आहे. योग्य तपास होईल, असा मला विश्वास आहे. मला आशा होती की आमचे विरोधी पक्षनेतेही सविस्तर चौकशीची मागणी करतील. विरोधकांनी नेहमी अक्कल जपली पाहिजे. तपशील निरोगी मन आणि निरोगी भावनांसह बाहेर आला पाहिजे. याचा दोन्ही पक्षांनी निषेध केला पाहिजे.
अभिषेक मनु सिंघवी या प्रकरणावर काय म्हणाले ? Parliament Winter Session ।
या प्रकरणावर अभिषेक मनु सिंघवी म्हणाले, ‘मी हे पहिल्यांदाच ऐकले आहे! मी जेव्हाही राज्यसभेत जातो तेव्हा 500 रुपयांची नोट सोबत घेतो. काल दुपारी 12.57 वाजता मी सभागृहात पोहोचलो आणि 1 वाजता सभागृह सुरू झाले. मग मी 1.30 पर्यंत कॅन्टीनमध्ये अवधेश प्रसादसोबत बसलो आणि मग संसदेतून बाहेर पडलो! तुमच्याकडे संपूर्ण माहिती असल्यास कृपया मला कळवा.” असे त्यांनी यावेळी म्हटले.





