संसदेचे पहिले विशेष अधिवेशन कधी होणार? ; सभापतीची निवड कधी होणार? तारीख आली समोर

Parliament Special Session । लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर आता संसदेचे पहिले अधिवेशन कधी भरणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, आता संसदेच्या पहिल्या अधिवेशनाची तारीख समोर आली आहे. त्यानुसार 24 जून ते 3 जुलै दरम्यान संसदेचे विशेष अधिवेशन होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
26 जून रोजी लोकसभा अध्यक्षपदाची निवड Parliament Special Session ।
एका वृत्तवाहिनीने दिलेल्या माहितीनुसार, 18 व्या लोकसभेसाठी नवनिर्वाचित खासदार 24 आणि 25 जून रोजी शपथ घेण्याची शक्यता आहे. त्याच बरोबर 26 जून रोजी लोकसभा अध्यक्षपदाची निवडणूक होण्याचा अंदाज व्यक्त केला जातोय. लोकसभेच्या अध्यक्षपदासाठी केंद्र सरकारकडून सर्वप्रथम खासदाराचे नाव प्रस्तावित केले जाईल. विरोधकांनी सरकारचा प्रस्ताव एकमताने मान्य केल्यास निवडणुका होणार नाहीत. तसे न झाल्यास विरोधकही आपल्या बाजूने उमेदवार उभे करू शकतात.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू संयुक्त अधिवेशनाला संबोधित करणार ? Parliament Special Session ।
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या दोन्ही सभागृहांच्या म्हणजे लोकसभा आणि राज्यसभेच्या संयुक्त अधिवेशनाला संबोधित करू शकतात. राष्ट्रपती मुर्मू आपल्या अभिभाषणातून केंद्रातील मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळाचा अजेंडा मांडणार आहेत.
त्याचबरोबर संसदेच्या विशेष अधिवेशनात काँग्रेससह इतर विरोधी पक्ष अनेक मुद्द्यांवर केंद्र सरकारला कोंडीत पकडू शकतात. अलीकडेच, काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी NEET-UG वैद्यकीय प्रवेश परीक्षेच्या वादावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला होता आणि ते म्हणाले होते की ते संसदेत विद्यार्थ्यांचा आवाज बनतील.
दरम्यान, नरेंद्र मोदींनी रविवारी सलग तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली. पंतप्रधान मोदींसोबत, ७० हून अधिक मंत्र्यांनीही पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली, पंतप्रधानांनी सोमवारी (१० जून २०२४) नवनियुक्त मंत्र्यांमध्ये विभागांचे वाटप केले. यामध्ये राजनाथ सिंह संरक्षण मंत्री, अमित शहा गृहमंत्री, निर्मला सीतारामन अर्थमंत्री आणि एस जयशंकर परराष्ट्र मंत्रीपदी कायम ठेवण्यात आले आहेत.





