Paris Paralympics 2024 : कपिल परमारचे ज्युदोमध्ये ऐतिहासिक कांस्यपदक….

Paris Paralympics 2024 (Judo : Men’s J1 – 60 Kg Bronze Medal Match) : पॅरालिम्पिक स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी चमकदार कामगिरी सुरूच ठेवली आहे. गुरुवारी भारताचा पॅरा ज्युदोपटू कपिल परमारने (Kapil Parmar) चमकदार कामगिरी करत कांस्यपदक पटकावले. कपिलने पुरुषांच्या 60 किलो जे1 (J1) स्पर्धेच्या कांस्यपदकाच्या लढतीत ब्राझीलच्या एलिटॉन डी ऑलिव्हेराचा 10-0 असा पराभव केला आणि कांस्य मिळवण्यात यश मिळवले.
यासह कपिलने इतिहास रचला आहे कारण पॅरालिम्पिक किंवा ऑलिम्पिकमध्ये ज्युदो या खेळप्रकारात पदक जिंकणारा तो पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे. इतिहासात भारताला ज्युदोत आतापर्यंत एकही पदक जिंकता आले नव्हते. हा पराक्रम कपिलने करून दाखवला. यासह पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये भारताच्या पदकांची संख्या 25 झाली आहे. पॅरिस गेम्समध्ये भारताने आतापर्यंत पाच सुवर्ण, नऊ रौप्य आणि 11 कांस्यपदके जिंकली आहेत.
#ParaJudo🥋: Men’s J1 – 60 Kg #Bronze Medal🥉 Match #ParisParalympics2024🇫🇷 debutant Kapil Parmar clinches a historic #Bronze🥉, beating Brazil’s🇧🇷 Elielton de Oliveira 10-0 via an Ippon.
It is also a first-ever medal🏅 for India🇮🇳 in #ParaJudo in the history of… pic.twitter.com/25xhp8eM7K
— SAI Media (@Media_SAI) September 5, 2024
साल 2022 च्या आशियाई क्रीडा स्पर्धेत परमारने याच प्रकारात रौप्य पदक जिंकले होते. त्याने उपांत्यपूर्व फेरीत व्हेनेझुएलाच्या मार्को डेनिस ब्लँकोचा 10-0 ने पराभव केला, परंतु उपांत्य फेरीत इराणच्या एस बनिताबा खोर्रम अबादीकडून त्याला पराभव पत्करावा लागला होताकपिलला सुवर्ण मिळवता आले नसले तरी कांस्यपदक जिंकण्यात तो यशस्वी ठरला. त्याचवेळी, महिलांच्या 48 किलो J2 गटाच्या उपांत्यपूर्व फेरीत भारताच्या कोकिलाला कझाकिस्तानच्या अकमारल नौटबेकविरुद्ध 0-10 असा पराभव स्वीकारावा लागला.
कपिलला सुवर्ण मिळवता आले नसले तरी कांस्यपदक जिंकण्यात तो यशस्वी ठरला. त्याचवेळी, महिलांच्या 48 किलो जे2 (J2) गटाच्या उपांत्यपूर्व फेरीत भारताच्या कोकिलाला कझाकिस्तानच्या अकमारल नौटबेकविरुद्ध 0-10 असा पराभव स्वीकारावा लागला.

